शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ, देवस्थान कमिटीची विशेष उपस्थिती ; हब्बनहट्टी गावात आज रात्री ‘तुटली माया सासरची ‘ हा नाट्यप्रयोग होणार सादर..
हब्बनहट्टी: लोकहित न्यूज..
जिल्ह्यात प्रसिद्ध तिर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हब्बनहट्टी (ता. खानापूर) येथील श्री स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्रावर बजरंग बली मारुतीचा गजर करण्यात आला. सकाळीं 6 वा. हनुमान जन्मोत्सव, 12 वा. सत्यनारायण पूजा, दुपारी 1 ते 3 यावेळेत महाप्रसाद ग्रहण करण्यात आला, यावेळी बेळगांव, गोवा, खानापूर व जांबोटी भागातून शेकडो भाविक उपस्थित होते. यावेळी देवस्थान कमिटी अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर, कार्याध्यक्ष नेताजी घाडी,सचिव संतोष कदम, सदस्य सखाराम धुरी, चीदंबर गावकर, नानू गावडे, नामदेव पाटील, गंगाराम गावडे, शंकर गावडे, सिध्दांप्पा गावडे, गोविंद दे.गावडे, गावडू गावडे, सायंकाळी 6 ते 9 पर्यंत गावात श्रींची पालखी पालखी मिरवणूक काढण्यात आली. तर रात्री 11 वाजता हब्बनहट्टी गावात नारायण यळगुळकर लिखित सामाजिक आणि तमाशाप्रधान ‘ तुटली माया सासरची ‘ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply