गर्लगुंजी गावामध्ये नेम्मदी केंद्र सुरू करा..


सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांचे महसूलमंत्र्यांना निवेदन..

जांबोटी: लोकहित न्यूज

     गर्लगुंजी हे खानापूर तालुक्यातील महत्वाचे गाव आणि मोठे गाव असून , या परिसरातील हे एक मध्यकेंद्रही असल्याने या याठिकाणी तत्काळ महसूल खात्याचे ऑनलाईन नेम्मदी सुरू करा या आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांनी महसूल मंत्री कृष्ण भैरेगावडा यांना कुसमळी पुलाच्या पाहणीवेळी सादर केले. सदर निवेदनात, गर्लगुंजी हे खानापूर तालुक्यातील महत्वाचे गाव असून, आसपासच्या वीसेक खेड्यांचे मध्यकेंद्र आहे. त्यामुळे याठिकाणी तहसीलचे नेम्मदी तत्काळ सुरू करण्याची गरज आहे. सद्या या गावाहून सुमारे तीस किलो मिटर अंतरावर असणाऱ्या जांबोटी येथे नेम्मदी केंद्र असल्याने नागरिकांची हेळसांड होत असून, वेळेत कामे होणे कठीण झाले आहे. त्यामुळें याठिकाणी हे केंद्र सुरू केल्यास नागरिकांना दिलासा मिळणार आहे. शिवाय कामेही वेळेत होतील. सद्या ईदलहोंड, गणेबैल खेमेवाडी, माळअंकले, प्रभूनगर, निटुर, बाचोळी आदी आजुबाजूच्या गावांना जांबोटी नेम्मदी केंद्रांवर अवलंबून रहावे लागते. तरी आपण याची दखल आमची मागणी पूर्ण करावी असे नमूद करण्यात आले आहे. सदर निवेदन स्वीकारून त्वरीत ही समस्या निकालात काढण्यात येईल अशी हमी महसुलमंत्र्यांनी दिली. सदर निवेदनावर नागरीकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *