पहिल्यांदा इराणकडून शस्त्रसंधी होईल, त्यानंतर इस्रायल करेल 12 दिवसांनी युद्धबंदी..
वृत्तसंस्था: वॉशिंग्टन लोकहित न्यूज..(देश -विदेश)
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेले इराण इस्रायल यांच्यातील युद्ध आता थोड्याच दिवसात थांबणार आहे, तसा दोन्हीं देशांमध्ये तसा करार झाल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्रूथ सोसियल पोस्टद्वारे दिली आहे.
……काय म्हणाले ट्रम्प …..
‘ सर्वांचे अभिनंदन ‘ इस्रायल आणि इराण या दोन्हीं देशांनी 12 तासांसाठी युद्धविरामास पूर्णपणे सहमती दर्शवली असून, या काळात दोन्हीं देश आपल्या अंतिम मोहिमा पूर्ण करतील, त्यानंतर दोन्हीं देशांतील युद्ध संपले असे मानावे लागेल. यावेळी युद्धबंदीची सुरवात इराणकडून होईल , त्यानंतर इस्रायल 12 तासांनी युद्धबंदीला सुरवात करणार आहे. 24 व्या तासाला,12 दिवस हे युद्ध चालले होते , ते आता समाप्तीच्या मार्गावर आल्याने दोन्हीं देशांच्या या कृतीला जग सलाम करेल , युद्ध बंदीच्या प्रत्येक टप्यात दोन्हीं देशात शांतता राहील असे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. पुढे बोलतांना, ट्रम्प म्हणाले की, हे युद्ध अनेक वर्षे चालले असते तर पूर्वेकडील भाग जळून खाक झाले असते. दोन्हीं देशांनी दूरदृष्टी, संयम, धैर्य दाखवत युद्ध समाप्त केले हे अभिनंदनीय आहे, सर्वकाही नियोजनानुसार पार पडले असले तरी दोघांनीही याला विराम देण्याचा निर्णय घेतला असेही त्यांनी स्पष्ट केले.
…….या युद्धामुळे तिसऱ्या युद्धाची होती चर्चा…. भारतासाठी चिंतेचा विषय होता…
इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जगात तिसरे महायुद्ध होणार की काय? अशी चिंता सर्वत्र व्यक्त केली जात होती. परिणामी दोन्हीं देशांच्या मोठया युद्धामुळे भारतासाठी चिंतेचा विषय बनला होता, कारण इराणकडून भारताला पेट्रोल -डिझेल आयात केले जाते. परिणामी युद्धामुळे इराणने तेलसाठ्याकडील भाग बंद केला होता. त्यामुळें तेथून तेलसाठा नाहीं झाल्यास तेल इंधनाच्या किंमती भडकल्या असत्या, आता युद्धच थांबणार असल्याने ही चिंता तूर्तास तरी दूर होण्याची शक्यता आहे.







Leave a Reply