महामानव डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात मोठया प्रमाणात उत्सव साजरा होतोय..
लोकहित:न्यूज ( विशेष प्रतिनिधी)
स्वातंत्र्याच्या आधी भारत देशात हुकूमशाही, राजेशाही आणि त्यानंतर जातीभेदाच्या भोवऱ्यात सामान्य जनता सापडली होती. एक समाज सोडला तर इतर समाजाच्या नागरिकांना ताठ मानेने जगण्याची मूबा नव्हती. त्यांना तुच्छ मानले जायचे, सार्वजनिक ठिकाणीं बंदी, मंदिरात प्रवेश नाहीं अर्थात एकूण काय तर या घटकांना किंमतच नव्हती असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. ओबोशी, मागासवर्गीय समाजाला खूप हाल सहन करत दिवस काढावे लागत होते. अशावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजेंची प्रेरणा आणि शाहू , फुलेंच्या पावलावर पाऊल टाकत जगाचे भाग्यविधाते विश्र्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक त्रास सहन करत,अथक परिश्रम घेऊन वंचित बहुजन समाजासाठी जे महान कार्य केले त्याला तोड नाही. बाबासाहेबांनी समाजात फिरण्यास मुकलेल्या बहुजनांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी संविधानाची निर्मिती केली. या त्यांच्या महान कार्याला सलाम… लोकहित न्यूज तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!
संविधान सामान्यांचा जगण्याचा आधार..
महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाची पूर्तता होताच स्वातंत्र्य भारतात लोकशाहीचे राज्य आले. म्हणजे काय तर प्रत्येकाला स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार मिळाला, त्याच बरोबर कायद्याचे बळ प्राप्त झाले. परंतु, आजचे राजकर्ते संविधानाचा बाऊ करतांना दिसताहेत, त्या कृतीला सामान्य नागरिकांनी वेळीच हाणून पाडले पाहिजे. तर लोकांचे राज्य कायम राहील. याची प्रत्येक नागरिकाने जाणीव ठेवण्याची गरज आहे.
प्रतिक्रिया..
महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे देशाचेच नव्हे ते जगाचे महन व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्यामुळे आज सामान्य नागरिक ताठ मानेने जगताहेत. बाबासाहेबांच्या प्रेरणेने आम्हीं घडतो आहोत,बाबासाहेब हे जगाचे महान पुरुष आहेत..
– राजू कांबळे, जिल्हा भीमसेना कार्याध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते.

Leave a Reply