आज रुग्ण ऑनलाईनच्या मायजाळात भरकटत चाललेत…
खानापूर: लोकहित न्यूज..
डॉक्टर अर्थात वैद्य हे आजच्या जगातील जणू देवच आहेत, मृत्यूपासून एक पाऊल दूर अर्थात शेवटची घटका मोजत असणाऱ्यांनाही डॉक्टरांकडून जीवदान दिल्याचे प्रसंग घडले आहेत. असे असताना आजचा रुग्ण ऑनलाइन आरोग्यसेवेच्या जाळ्यात सापडला असून, वेळोवेळी रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य असले तरी तसे होतांना दिसत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यात डॉक्टरांची भूमिका फार मोलाची आहे, डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांसाठी सर्वकाही त्यागाच्या भूमिकेत असतात, आणि म्हणूनच रुग्णांनी डॉक्टरांशी ऋणानुबंध जपले पाहिजे असे मत खानापुरचे प्रसिद्ध डॉ. डी.ई.नाडगौडा यांनी ‘लोकहित न्यूज’ शी बोलताना मांडले. आजच्या ‘ डॉक्टर डे ‘ निमित लोकहित न्यूज चे संपादक विलास कवठणकर यांनी तालुक्याची डॉक्टरांची घेतलेली खास मुलाखत …
…आज आरोग्य ठीक तर सर्व ठीक; काय म्हणतात डॉक्टर….
आजच्या धावपळीच्या युगात डॉक्टर हा घटक प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचा पैलू बनला आहे. कारण आरोग्य ठीक तर सर्वकाही ठीक असे म्हंटले जाते, ते गैर नाहीं.
…आज डॉक्टर जरी देव म्हणून ओळखले जात असले तरी रुग्ण आणि डॉक्टरांचे नाते कमी होताना दिसत आहे, रुग्णांनी ऑनलाइन आरोग्य सल्ल्याच्या मागे न धावता थेट आमच्याशी संपर्क साधला पाहिजे. आम्हीं अहोरात्र त्यांच्या सेवेशी तत्पर आहोत. ऑनलाईननुसार आरोग्याची काळजी घेणाऱ्यांच्या जीवावर बेतू शकते, याची दक्षता घेण्याची गरज आहे. आम्हीं प्रत्यक्ष तपासूनच रुग्णांना सल्ला देत असतो. तरीही रुग्ण याचा का? विचार करत नाहीत असा प्रश्न पडतो. पुढे,बोलतांना त्यांनी सर्वांना डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
- डॉ. डी.ई.नाडगौडा, प्रसिद्ध वैद्य खानापूर..
..
रुग्ण आणि डॉक्टर हे नाते घट्ट होण्यासाठी दोघांनीही पुढे आले पाहिजे, आज कोणत्याही ऑनलाइन अफवांवर विश्वास ठेवू नये. आपापल्या डॉक्टरांचा सल्ला घेवूनच आरोग्याची काळजी घ्यावी. सद्या पाऊस – उण असे वातावरण असून, अशा वातावरणात महत्वाचा घटक असलेल्या स्वच्छ पाणी, आजूबाजूची स्वछता सर्वांनी ठेवली पाहिजेत. तरच आरोग्य सुरक्षित राहू शकते. चोवीस तास आम्ही आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असतो. ‘साई क्लिनिक ‘खानापूर तर्फे सर्वांना डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
डॉ. महेश कदम, साई क्लिनिक खानापूर
..लोकहित न्यूजतर्फे डॉक्टर दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Leave a Reply