पालकातून समाधान; पहिलीपासून विद्यार्थ्यांना मिळणार कॉम्प्युटरचे धडे…
देवाचीहट्टी: लोकहित न्यूज
क्वालिटी पोल्ट्री फार्म कंपनीकडून देवाचीहट्टी ( ता. खानापूर) मराठी प्राथमिक शाळेला संगणक ( कंप्युटर) व डिजिटल फलक भेट म्हणून देण्यात आले. यामुळें पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे धडे मिळणार आहेत. क्वालिटी (पोल्ट्री) कंपनीच्या या सामाजिक कार्याबद्दल पालकातून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर यांच्याहस्ते भेट वस्तूंचे पूजन करण्यात आले. यावेळी क्वालिटी कंपनीचे मुख्य डॉक्टर मधुकर पवार व त्यांचे सहकारी, मुख्याध्यापक विवेक कांबळे , पालक भोजू बामणे, रमेश कांबळे, दिपक बामणे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाटील, शाळेचे सहशिक्षक आदी पालक उपस्थित होते.

Leave a Reply