देवाचीहट्टीत पांडूरंग सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी मनोरंजनात्मक कार्यक्रमाला दाद..
देवाचीहट्टी: लोकहित न्यूज
आजच्या समाजात पूर्णपणे धार्मिक व पुर्णपणे नास्तिक घटक दिसुन येत नाही. त्यामुळे देवापर्यंत पोहचणार कशे? अन् ज्याची त्याची मागणी कशी पूर्ण होणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. कारण!मनी नाही भाव आणि देवा मला पाव! अशी आजच्या समाजाची धारणा आहे. देवाचीहट्टी (ता.खानापूर) येथील 30 व्या श्री. पांडूरंग सप्ताह सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री आयोजित केलेल्या मनोरंजनात्मक कार्यक्रमात आजच्या समाजाची देवाविषयी आणि डिस्को जमण्याबध्दलच्या मानसिकतेचे दृश्य दाखविण्यात आले. आधुनिक संगीत सोंगी भारूड असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते.
…भक्ती, मनोरंजन, मोबाईलमुळे होणाऱ्या विपरीत परिणामांचे सादरीकरण…
सदर भजनीं भारूडमध्ये आजच्या समाजाची भक्ती भावना भक्ती कशी आहे आणि त्यात आधुनिक संगीताचे कशे? मिश्रण होवू लागले आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मनोरंजनाचे महत्व किती महत्वाचे आहे हेही दाखविण्यात आले. आज मोबाईलमुळे जग जवळ आले असले तरी दूसरीकडे त्यामुळे दुष्परिणाम वाढले आहेत. मोबाइलमुळे फसवणुकीचे प्रकार कमी होण्याचे नाव घेईना. सोसियल मीडियाच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून गैरकारभार, महत्वाच्या व्यक्तिगत गोष्टींची माहिती घेतली जाते. असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी मोबाइलच्या अधिक आहारी जाऊ नये. सावधानता बाळगावी असेही या भारूड मध्ये दाखविण्यात आले..
रमेश कांबळे यांचा निवृतीपर गावकऱ्यांच्याहस्ते विशेष सत्कार..
तब्बल 22 वर्षे प्रामाणिकपणे सैनिकात सेवा बजावून निवृत्त झालेले देवाचीहट्टी गावचे सपुत्र रमेश मारुती कांबळे यांचा यावेळी गावकऱ्यांच्याहस्ते विषेश सत्कार करण्यात आला. रमेश कांबळे हे शालेय पातळीवरही हुशार विद्यार्थी आणि शांत व्यक्तीमत्व म्हणून त्यांची जांबोटी भागात ओळख आहे. उत्कृष्ठ क्रिकेटपटू म्हणूनही त्यांचा भागात परिचय आहे. यावेळी ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठनकर, सुनील केरीकर , सतीश धुरी,विलास कवठनकर, विक्रम धुरी, काशिनाथ बामणे, भोजू बामणे, संदीप गावडे, नंदू कलमनकर, लक्ष्मण गावडे , रमेश गावडे, तानाजी गावडे आदी उपस्थित होते..


Leave a Reply