बुधवारी देवाचीहट्टीत गोव्याच्या किर्तनकार चिन्मयी कामत यांचे किर्तन


तीस वर्षांपासून होतोय पांडूरंगाचा गजर; गुरुवारी महाप्रसाद..

देवाचीहट्टी: लोकहित न्यूज

  देवाचीहट्टी ( ता. खानापूर) येथे बुधवारी (दि.26 ) रोजी गोवा येथील प्रसिद्ध किर्तनकार ह.भ. प चिन्मयी कामत यांचे किर्तन होणार आहे. त्यानिमित्त तोराळीसह हब्बनहट्टी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. गेल्या तीस वर्षांपासून याठिकाणीं पांडुरंगाचा गजर होतोय. यासाठी गावकरी व वारकऱ्यांच्या अथक परिश्रम फलदायी ठरले आहेत.

बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस धार्मिक कार्यक्रम

    कैवल्याचा चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे विध्यावराज हभप श्री वासकर महाराज यांच्या शुभआशीर्वादाने तसेच हभप श्री शांताराम कुंभार महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमांची रूपरेषा अशी…बुधवार दि.26 रोजी सकाळीं 6.30 वाजता पोथी पूजन ,9 ते 12 ज्ञानेश्वरी वाचन, 12 ते सामुहिक भजन, 3 ते 4 हरिपाठ, 4 ते 5 ह.भ.प शांताराम कुंभार महाराज यांचे यांचे प्रवचन , रात्री 9 ते 12 यावेळेत निरूपण किर्तन होईल. गुरुवार दि.27 रोजी पहाटे 6.30 वा .काकड आरती,8 ते  10 यावेळेत गावातून श्रींच्या पालखीची मिरवणूक, 10 ते 12 यावेळेत ह.भ.प शांताराम कुंभार यांचे कालाकिर्तन त्यांनंतर महाप्रसादाचे धार्मिक कार्यक्रमांची सांगता होईल. तर रात्री 10 वाजता सावर्डे ( बु) येथील मंडळाचे आधुनिक संगीत सोंगी भजनीं भारूड होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे गावकऱ्यांतर्फे कळविण्यात आले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *