संचालक अरविंद पाटील आणि अध्यक्ष लक्ष्मण कसकर्लेकर यांच्यात राजकीय जुगलबंदी; कोण बाजी मारणार?
जांबोटी : लोकहित न्यूज
कधी काळाचे मित्र,कधी काळाचे राजकीय विरोधक अशी जुगलबंदी असणाऱ्या मा.आ.तथा विद्यमान डीसीसी बँक संचालक अरविंद पाटील आणि आमटे कृषी पत्तीनचे चेअरमन लक्ष्मण कसर्लेकर या दोघा नेत्यांचे राजकारण कधी कोणत्या थराला जाईल हे सांगणे कठीण आहे. असेच चित्र आमटे कृषी पत्तीनच्या पाठिंब्यावरून दिसून येत आहे. परवा परवा तर आमटे कृषी पत्तीनचे चेअरमन लक्ष्मण कसर्लेकर यांनी काहीं संचालक व स्वतः विद्यमान संचालक अरविंद पाटील यांच्या विरोधात पाठींबा दर्शविला होता. मात्र, त्याच्या काहीच दिवसांत संचालक अरविंद पाटील यांनी उपाध्यक्ष सुभाष गावडे यांच्यासह सहा संचालकांसोबत बैठक घेवून सोसियल मीडियाद्वारे आपल्या बाजूने पाठिंबा जाहीर करुन घेतला आहे. त्यामुळें नेमका या सोसायटीचा कोणाला पाठींबा? असा प्रश्न उपस्थित होत असून, चेअरमन लक्ष्मण कसर्लेकर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
…….काय म्हणाले उपाध्यक्ष, संचालक….
अरविंद पाटील यांच्या उपस्थितीत संचालक बसवंत नाईक यांनी व्हिडिओद्वारे जाहीर केले आहे की , संचालक सुधीर चीगुळकर, आनंदी नाईक, खाचू गांवकर, रायाप्पा गावडे, उपाध्यक्ष सुभाष गावडे यांच्यासह सात जण मिळून विद्यमान संचालक अरविंद पाटील यांना पाठींबा जाहीर करत असून, काही झाले तरी हा आमचा पाठींबा कायम राहील असेही बळवंत नाईक यांनी पुढे बोलतांना म्हंटले आहे. तसा व्हिडियो एका ग्रुपवर प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळें या सोसायटीचे राजकारण आणखीनच ढवळून निघणार की काय? असे चिन्हं दिसत आहे.
प्रतिक्रिया –
आज आमची आणि मा. आ. तथा विद्यमान संचालक अरविंद पाटील यांची बैठक झाली, त्यावेळी आम्ही सात संचालकांनी अरविंद पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे, तो कायम राहील..
-सुभाष गावडे , उपाध्यक्ष आमटे कृषी संघ.
Leave a Reply