तालुका संचालक पदाप्रतिक्रिया चे वारे जोरात, विद्यमान संचालक अरविंद पाटील यांच्याकडून जोरदार मोर्चेबांधणी..
खानापूर: विलास कवठणकर (लोकहित न्यूज)
गेल्या निवडणुकीपासून सर्वांच्याच प्रतिष्ठेचा मुद्दा ठरलेल्या जिल्हा मध्यवर्ती (डीसीसी ) बँक संचालकपद सर्वांनाच हवे हवेशे वाटू लागले आहे. गेल्यावेळी तत्कालीन आ. डॉ.अँजली निंबाळकर आणि आतापर्यंत या बँकेवर निर्विवाद वर्चस्व असलेल्या माजी आमदार अरविंद पाटील यांच्यात मोठी चुरस पहायला मिळाली होती. अखेर विद्यमान संचालक अरविंद पाटील यांनी थोडक्यात बाजी मारली होती. यावेळी तर अरविंद पाटील यांची खरी कसोटी पणाला लागणार की, काय असे चिन्हं दिसू लागले आहे. त्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू केलेल्या जोरदार तयारीचा त्यांना फायदा मिळणार? हे येणारा काळच ठरवेल. यात तिळमात्र शंका नसेल, याचाच एक भाग म्हणून माजी आमदार अरविंद पाटील यांनी उद्या ( बुधवार दिनांक 18 ) रोजी तालुक्यांतील कृषी पत्तीनच्या (पीकेपीएस ) अध्यक्षांना बैठकीसाठी प्राचारण केले आहे. या बैठकीनंतरच या निवडणुकीची पुढची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. विद्यमान संचालक अरविंद पाटील यांनी आपली जोरदार तयारी केली असून, काहीं संघांच्या अध्यक्षांनी त्यांना जाहीर पाठिंबाही दर्शविला आहे. त्यामुळें सद्या तरी पाटील यांचे पारडे जड दिसत आहे. …..अरविंद पाटील यांच्या विरोधीबाबत चर्चा केली तर… विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी आपण इच्छूक असल्याचे सांगत काहीं पीकेपीएस अध्यक्षांशी संपर्क साधत असून, काहींच्या संपर्कात आहेत तर तालुक्यांतील आणखी एका गटाची छुपी तयारी सूरू आहे काय? अशा वेगवेगळ्या चर्चा चौका चौकात रंगू लागल्या आहेत. त्यामध्ये कितपत तथ्य आहे, हे उद्याच्या बैठकीनंतर स्पष्ट होईलच…. एकूणच काय तर यावेळची डीसीसी निवडणूक चांगलीच रंगणार हे माञ, नक्कीच.. त्यामुळें यावेळी डीसीसी बँक ‘किस किसकी ‘ असेच म्हणावे लागेल..
…माजी मंत्री भालचंद्र जारकीहोळी यांचा सहभाग हा मंत्री हेब्बाळकर यांना शह का?
जारकीहोळी हे नाव राज्यभर गाजलेले आहे, त्यांच्यातीलच महत्वाचे स्थान असलेल्या भाजपचे माजी मंत्री, विद्यमान आमदार तसेच केएमएफ अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांचा सहभाग हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. उद्याच्या बैठकीत जारकीहोळी यांच्यासह विद्यमान डीसीसी बँक अध्यक्ष अप्पासाहेब कलगुडे, कित्तुर चे माजी आमदार विद्यमान संचालक महातेश दोड्डगौडर , संचालक राजू अंकलगी, रामदुर्ग चे संचालक श्रीकांत धवन यांनीही उपस्थित राहणार आहेत. अशीही ही कसलेली मंडळी त्यात विद्यमान अध्यक्ष तीन महत्वाचे संचालकांचा सहभाग बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न आहे. मागच्यावेळी अचानकच रमेश कत्ती यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळें काहीं काळ जिल्ह्यासह राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर लगेच जारकीहोळी बंधूंच्या सहकार्याने अप्पासाहेब कलगुडे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली होती. तेव्हापासून डीसीसी मधील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. गेल्या खासदारकीचा वचपा शिवाय खानापूरच्या पुढच्या विधानसभा निवडणुकीत आपल्या मुलगा मृणाल हेब्बाळकर यांना उतरण्यासाठी आतापासूनच तालुक्यात वातावरण निर्मितीचा भाग म्हणून आपला भाऊ विद्यमान विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांना डीसीसी बँक संचालक निवडणुकीत उतरविण्याचा राज्याच्या बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर खानापूर तालुक्याच्या थेट राजकरणात पाऊल टाकण्याचे पहिलाच प्रयत्न असेल. त्यात त्या कितपत यशस्वी होतात हे येणारा काळच सांगेल. विधान परिषदेच्या माध्यमातून हट्टीहोळी यांनी तालुक्यांतील मुख्य गावात निधी देवून विकास साधला आहे, त्यातून त्यांची तालुक्यात बऱ्यापैकी ओळख निर्माण झाली आहे.
…कृषीपत्तीन अध्यक्षावर पैशाचा पाऊस पडण्याची शक्यता..
या निवडणूकीत तालुक्यांतील कृषीपत्तीन संघाच्या अध्यक्षांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. कारण तेच ठरवणार पुढचा तालुक्याचा डीसीसी बँक संचालक. त्यामुळें आगामी काळात कृषी पत्तीन अध्यक्षांना चांगले दिवस येणार असून, त्यांच्या मतांसाठी पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता अजिबात नाकारता येणार नाही. वेळ पडली तर अध्यक्षांची पळवा पळवीही होवू शकते. एकंदरीत काय तर हे राजकारण तितकेसे सोपे नसणार आहे. हे राजकारण म्हणजे जारकीहोळी आणि हेब्बाळकर यांची राज्यातील प्रतिष्ठा ठरवणारे असेल का? अशाही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
…आमदार विठ्ठल हलगेकर यांची भूमिका काय असेल?
विद्यमान आमदार तसेच लैला शुगर्स च्या माध्यमातून खानापूर च्या पूर्व भागासह तालुक्याततील शेतकऱ्यांची आणि आ. विठ्ठल हलगेकर यांचे चांगले नाते आहे. शिवाय कृषी पत्तीन काहीं अध्यक्षही हलगेकर यांच्या विद्यमान आमदार म्हणून संपर्कात नसतील असे म्हणणे चुकीचे ठरेल का? असाही प्रश्न आहे. सद्या आ. हलगेकर आणि मा. आमदार अरविंद पाटील यांच्यात सर्व काही अलबेल आहे का? हा चर्चेचा विषय म्हणावा लागेल. असेल तर ते उद्याच्या बैठकीनंतर दिसेलच. या शक्यता जर तर वर अवलंबून असतील.. मागच्या दोन महिन्यांत याबाबत बैठका, शपथांचा सपाटा सुरू असल्याच्या चर्चा ठिकठिकाणी जोरात सुरू होत्या. त्यात कितपत तथ्य आहे हे थोड्याच दिवसात कळेल.
प्रतिक्रिया ;
सर्वसाधारण सौहार्द म्हणून बैठक बोलावली आहे. त्यानिमत्ताने तालुक्यांतील सर्व कृषी पत्तीन अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. मीच ही बैठक बोलावली आहे.
- अरविंद पाटील, मा. आ. विद्यमान संचालक डीसीसी बँक..
Leave a Reply