दांडेली: लोकहित न्यूज
जिल्हा भीमआर्मीचे सचिव नागेश कांबळे ओलमनी (ता. खानापूर) यांना कला कौस्तुभ संस्थेतर्फे सेवारत्न पुरस्कार बहाल करण्यात आला. तालुक्यात गेल्या पाच वर्षातील सामाजिक कार्याची दखल घेऊन नागेश यांना हा पुरस्कार देण्यात आला. राज्यातील नावाजलेली सामाजिक संस्था म्हणून कौस्तुभ संस्थेचे नाव घेतले जाते. या संस्थेतर्फे दरवर्षी सामाजिक कार्यात उत्तम काम करणाऱ्यांचा सन्मान केला जातो. यावेळीही नागेश यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी खानापूरचे नेते राजू खातेदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ! लोकहित न्यूज तर्फे नागेश कांबळे यांचे अभिनंदन!
Leave a Reply