बंगळूर कमिशनरांकडून बैलूर पंचायतीच्या ‘बिल्डिंगला’ मिळणार अप्रुल; अध्यक्ष – सदस्यांच्या प्रयत्नांना यश!


लोकहित न्यूजच्या वृताची जि. पं., बैलूर अध्यक्ष सदस्यांकडून दखल…

  

बंगळूर : लोकहित न्यूज नेटवर्क

        बैलूर ( ता. खानापूर) ग्राम पंचायत इमारतीला जिल्हा पंचायतीकडून अप्रुल न मिळाल्याने काम थांबले होते. ग्राम पंचायत अध्यक्ष – सदस्यांनी अनेकवेळा प्रयत्न करुनही हे काम होत नव्हते! अखेर या समस्येबाबत लोकहित न्यूज ने आवाज उठवताच बैलूर पंचायत अध्यक्ष- सदस्य पीडीओ आणि जिल्हा पंचायतीने याची दखल घेतली असून, अध्यक्षा अरोही अनंत सावंत, सदस्य प्रदीप कवठणकर, पीडीओ आनंद भिंगे आणि अभियंते बसवराज, सामाजिक कार्यकर्ते अनंत सावंत यांनी बंगळूर गाठत ग्रामीण सुधारणा आयुक्तांची भेट घेऊन ही समस्या मांडली. याची दखल घेत तात्काळ सदर कामाला मंजुरी देण्याची हमी दिली असून,यासाठी जिल्हा पंचायतीचे पत्र देवुन मंजुरी दिली. यामुळें इमारतीच्या कामाला गती येणार आहे.

लाखो रुपये मंजूर होवूनही ‘अप्रुल’ मुळे सहा महिने काम रखडले..

         बैलूर पंचायत इमारतीसाठी लाखो रुपये निधी मंजूर होवूनही जिल्हा पंचायत अप्रुलमुळे हे काम 6 महिने हे काम रखडले होते. त्यामुळे मंजुर असलेला निधी परत जाणार की काय असा प्रश्न उपस्थित झाला होता. ग्राम पंचायत अध्यक्ष -सदस्यांकडून अनेक प्रयत्न झाले पण, जिल्हा पंचायतीकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळेच इतके महिने हे काम रखडले.

..अखेर ग्राम अध्यक्ष – सदस्यांच्या प्रयत्नांना यश ….

       अनेक प्रयत्न करूनही अप्रुल चे काम होत नव्हते, अखेर ग्राम पंचायत अध्यक्षा आरोही अनंत सावंत आणि देवाचीहट्टीचे ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर, सामाजिक कार्यकर्ते अनंत सावंत यांनी बंगळूरला जावून ग्रामीण विकास आयुक्तांची भेट घेऊन समस्येची जाणीव करून दिली. लागलीच तात्काळ आयुक्तांनी होकार देत, जिल्हा पांचातीचे एक पत्र द्या आम्हीं मंजुरी देतो असे सांगितले शिवाय बेळगावच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेत, सहकार्य करण्याची सूचना केली. अखेर अध्यक्ष आणि सदस्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, लवकरच पंचायत इमारतीच्या कामाला गती येणार आहे. बंगळूर भेटीवेळी पीडीओ आनंद भिंगे, पंचायतीचे अभियंते बसवराज यांनीही यावेळी उपस्थित होते.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *