खात्यावर पैशे असतानाही डीडी देण्यास टाळटाळ केल्याप्रकरणी गांधीनगर कृषी पत्तीन संघाचे अध्यक्ष सुरेश दंडगल यांची पोलीसात तक्रार..
खानापुर: लोकहित न्यूज
गांधीनगर (खानापूर) कृषी पत्तीन संघाच्या खात्यावर पैशे असतानाही डीडी देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी तालुका डीसीसी बँक मॅनेजर कुरेर यांच्या विरोधात खानापूर पोलिस स्थानकात एफआयएर दाखल करण्यात आला आहे. गांधीनगर कृषी पतीन संघाचे अध्यक्ष सुरेश दंडगल यांनी ही तक्रार केली असून, तत्काळ दोषींवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी दंडगल यांनी पोलिसांकडे केली आहे.
दंडगल यांनी दिलेल्या तक्रारीत, मंगळवार ( दि. 3) रोजी अध्यक्ष सुरेश दंडगल आणि त्यांचे सचिव कपिल निट्टुरकर यांनी दोघेही डीसीसी बँकेत जावून आपल्या संघाच्या खात्यावर शिल्लक असलेल्या 2 लाख 67 हजार या रक्कमेतून डीसीसी बँकेचा शेअर्स भरण्यासाठी 27 हजार 500 रुपयेचा डीडी काढण्याची मागणी सहायक मॅनेजर सुरेशं कांबळे यांच्याकडे केली असता, त्यांनी कोणतेही ठोस कारण न देता नकार दिला. लागलीच सुरेश दंडगल यांनी मुख्य मॅनेजर कूरेर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून डीडी देण्याची मागणी केली. केरेर यांनीही साफ नकार दिल्याने अशा या मनमानी कारभाराविरोधात तत्काळ पोलीसात फिर्याद नोंद करून मॅनेजर कुरेर यांच्यावर एफआयएर दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली. त्यानुसार एफआयएर दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपासात या प्रकरणाचा उलगडा होणार आहे. व्यवस्थापकांनी जाणीवपूर्वक शेअर्स भरून घेण्यास अडवणूक चालविली असून , त्यांनी आमचा विश्वासघात केला आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सुरेश दंडगल यांनी केली आहे.

Leave a Reply