बंगळूर: लोकहित न्यूज
राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री पदकाने गौरविण्यात आले. यात राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व बेळगावमध्ये पोलिस प्रमुख म्हणून उत्तम सेवा बजावलेले हेमंत निंबाळकर यांचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते पदक देवून सन्मानित करण्यात आले. नुकतेच बंगळूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यातील इतरही अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. राज्यातील नक्षल मुक्त करण्यात हेमंत निंबाळकर यांचा सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे या कार्यक्रमात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही त्यांच्या कार्याबद्दल तोंडभरून कौतून केले. यावेळी गृहमंत्री जी. पी. परमेश्वर यांच्यासह राज्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply