आमदार साहेब कसं हे ? आणखी बळी हवेत का? रस्त्याच्या दुर्दशेची साधी पाहणीही नाहीं..
बैलूर: लोकहित न्यूज
आधीच रस्त्याची दुरवस्था झालेल्या बैलुर रस्त्याने चोर्ला मार्गाच्या वाहतुकीचा भार पडल्याने या रस्त्याच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या आहेत. शनिवारी या रस्त्यावरील बकरी शेडजवळ एक मालवाहू ट्रक पलटी होऊन नुकसान झाली आहे. सदर ट्रक पलटी झालेल्या ठिकाणीं असा रस्ता झाला आहे, की कोणत्याही क्षणी अपघात घडू शकतो. हलव्या पाळण्याप्रमाणे याठिकाणी रस्ता झाला आहे. असे असतानाही बांधकाम खाते, आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडून कोणत्याच हलचाली होताना दिसत नाहीत. बळी हवे का? असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारण्यात येत आहे. अहो आमदार साहेब नवीन रस्ता पावसात करता येत नाही ना! तर किमान खड्डे तरी बुजवा हो! एवढे काम केला तरी जनता धन्यता मानेल. अलीकडच्या वीस वर्षात रस्त्यांची तरी अशी अवस्था कधी झाली नव्हती! तालुक्यात सार्वजनिक बांधकाम खाते आहे काय? तालुक्यात? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
…..रस्त्याची सद्यस्थिती जय आहे?
सद्या बैलुर रस्ता म्हणजे जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. परिणामी या रस्त्यावर नुसतेच खड्डे पडले नाहीत तर मोठं मोठी तळी साचली आहेत. त्यातून मार्ग काढणे म्हणजे जीव मुठीत घेऊन मुठीत घेऊन प्रवास केल्यासारखे होवून बसले आहे. देवाचीहट्टी फाटा ते बैलुर फाट्यापर्यंत खड्डेच खड्डे पडलेले आहेत.
Leave a Reply