तत्काळ कामकाजाला होणार सुरवात आ. हलगेकर यांची ग्वाही..
बैलूर: लोकहित न्यूज..
जांबोटी पश्चिम भागात मोठे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलूर ( ता. खानापूर) गाव ते फाटा या पाच किमी रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे आज आ.विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते टिकाव मारून शुभारंभ करण्यात आले. या रस्त्यासाठी 4 कोटींचा भरीव निधी मंजूर झाला असून, तत्काळ या कामाला सुरवात होणार असल्याची ग्वाही आ. हलगेकर यांनी यावेळी दिली. त्यांच्या समवेत तालुका भाजप अध्यक्ष बसवराज सानिकोप, जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते लक्ष्मण झांजरे, बैलुर पंचायतीच्या अध्यक्षा आरोही सावंत, सदस्य रवींद्र गुरव, पीडीओ सुनिल अंबारे, बांधकाम खात्याचे तालुका सहाय्यक अभियंते संजय गस्ती, प्रकाश मजगावी, मंगेश मुळीक, पांडूरंग गुरव यांच्यासह गावचे नागरीक व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply