तालुक्याचे आधारस्तंभ मा. आ. अरविंद पाटील..


वाढदिवसानिमित्त तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव..

खानापूर : लोकहित न्यूज

तालुक्याचा कोणत्याही कोपऱ्यात, गावात चांगली -वाईट घटना घडली आणि त्याठिकाणी माजी आमदार, डीसीसी बँक संचालक, नंडगड मार्केटींग चें अध्यक्ष अरविंद पाटील यांनी पोहचले नाहीत असे अलीकडच्या वीस वर्षात घडलेच नाही. अपघातग्रस्तांना स्वतः हात लावून स्वतःच्या वाहनातून दवाखान्यात दाखल करणे, त्यांचा कार्यकर्ता असो वा ओळखीचा व्यक्ती असेल आणि त्यांच्याबद्दल वाईट  वा चांगली घटना कानी पडताच पहिली हजेरी पाटील यांचीच असते असं हे व्यक्तीमत्व जणू तालुक्याचा आधारस्तंभच बनून राहिले आहे. अर्थात तालुक्यांतील सर्व घटकांना मदतीचा आधार वाटणाऱ्या माजी आमदार अरविंद पाटील यांना तालुका तालुकावासीयांतर्फे तसेच ‘लोकहित न्यूज’ तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यावतीने मा. आ. अरविंद पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *