आमच्यात फोडा फोडीचे राजकारण करु नये; ते विरोधकांना जमनारच नाहीं…
जांबोटी: लोकहित न्यूज
बुडलेल्या आमटे (पीकेपीएस) कृषी पत्तीन संघाला मी संजीवनी दिली आहे, त्यासाठी भागधारक,हितचिंतकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यामुळेच आज हा संघ सुस्थित आहे, असे असताना त्यावेळीं दुर्लक्ष करणारे आता येवून आमच्यात फोडाफोडीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत असतील ते कधीच यशस्वी होणार नाहीत. आम्हीं सर्व संचालक एकत्र -एक दिलाने वाटचाल करत आहोत, त्यामुळे कायमच आमटे पीकेपीएस संघ माझ्या पाठीशी राहणार असल्याचे मत चेअरमन लक्ष्मण कसर्लेकर लोकहित न्यूज शी बोलताना मांडले.
पुढे, बोलतांना ते म्हणाले की, काही एजंटांना मध्यस्थी ठेवून विरोधक आमच्या काही संचालकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन दिवसांपूर्वी विरोधकांनी आमच्यातील काहीं आमच्यातील काही संचालकांशी बैठक घेऊन पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत , त्यांना माझा एकच प्रश्न आहे की, आमच्या संघाची पत का ? मंजूर केली नाहीं. परिणामी आजही शेतकरी बांधव पत मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. मी त्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण वरूनच मंजूर होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याला जबाबदार कोण? पहिल्यांदा विरोधकांनी येथे उत्तर द्यावे आणि नंतरच राजकारण करावे. बिथल्यामुळेच विरोधक असे कुरघोडीचे राजकारण करतांना दिसत आहेत. यावर कोणीही विश्वास ठेवू नये, आमच्या संघाला पत मंजुर करतांना त्यांच्याकडूनच आडवाअडवीचे प्रकार घडले आहेत हे संचालकांनीही लक्षात ठेवावे असे सांगतानाच, विरोधकांनी सरळ राजकारण करावे असेही ते म्हणाले.
…… संचालकांसोबत बैठक पार पडली….
नुकतीच आमटे पीकेपीएसच्या संचालकांबरोबर बैठक पार पडली. त्यामध्ये सर्वांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. शिवाय लक्ष्मण कसरलेकर यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी लक्ष्मण कसकर्लेकर यांच्यासह संचालक नारायण पाटील, रायाप्पा गावडे, विठ्ठल नाईक, जिजाबाई बामनवाडकर, उपाध्यक्ष सुभाष गावडे यांचा मुलगा विठ्ठल गावडे यांच्यासह आठ जण उपस्थित होते अशी माहिती लक्ष्मण कसर्लेकर यांनी लोकहित न्यूज शी बोलताना दिली. या बैठकीत, कोणाला पाठींबा द्यायचा हे आम्हीं ठरवले असून, त्यानुसारच सर्वकाही यात तिळमात्र शंका नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply