खानापूर पीएलडी PLD बँक आरोप – प्रत्यारोप ! कोणाचे खरे अन् कोणाचे खोटे? यात सहकार खात्याची काय भूमिका!
मुरलीधरां’च्या मुरलीतून कोण कोणते सूर उमटणार? आजच्या बैठकीत बँकेचे उपाध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर का? गैरहजर ! आरोपांवर अध्यक्ष पाटील यांचे कल्लाप्पा घाडी यांना प्रत्युत्तर !

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
गेल्या चार दिवसांपासून खानापूर भूविकास( PLD) बँकेच्या वार्षिक अहवालावरून, अध्यक्षांच्या कारभारावरून जोरदार डिजिटल मिडिया, वृत्तपत्रातून होतांना दिसत आहेत. याच बँकेचे माजी संचालक आलेल्या कल्लाप्पा घाडी यांनी अध्यक्षांच्या कारभारावर आसूड ओढत, सभासद शेतकऱ्यांना अहवाल का? वाटले नाहीत असे अनेक प्रश्न विचारत सहकार खात्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यावर घाडी यांच्या सर्व आरोपांचे विचार करून चौकशी करण्यात येईल अशी हमी सहकार खात्याने दिल्याचे ते सांगतात. पण, आज अध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी संचालकांची बैठक घेऊन घाडी यांनी केलेले सर्व आरोप राजकीय (रागातून) आकसापोटी असल्याचे प्रत्युत्तर दिले. यात महत्वाचे म्हणजे बँकेचे उपाध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर यांच्यासह आणखी तीन संचालक गैरहजर राहिले याचे कारण काय? त्यामुळे मुरलीधरांचे सूर कोणत्या दिशेने जाणार हे परवाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दिसून येणार हे मात्र, नक्कीच!
आधीच बँक लॉस’मध्ये त्यात हजारो सभासदांना अहवाल पाठवण्याचा खर्च तोलणारा नाही: अध्यक्ष मुरलीधर पाटील!
तुम्हीं कोणत्याही दुसऱ्या बँकेत बिचारा हजारो सभासदांना घरपोच अहवाल पाठवणे बँकेला सद्यस्थितीत शक्य नाही! त्यामुळे सहकार खात्याच्या मार्गदर्शनुसार अहवाल पाठवला नाही, एखादी बँक अथवा सोसायटी लॉस’मध्ये असताना अधिक खर्च करणे अधिकच अर्थिक अडचणीचे ठरते! बँकेतच अहवाल उपलब्ध असेल, तो प्रत्येकाने पाहून घ्यावा असे आवाहन पाटील यांनी केले.
कोणीही कधीही कारभाराबाबत चौकशी करावी; आम्हीं तयार आहोत!
बँकेच्या कारभाराबाबत विनाकारण राजकीय रागातून अनेक आरोप केले जात आहेत, त्यामध्ये कोणतेही तथ्य नसून, कलाप्पा घाडी यांनीही आमच्यासोबत 5 वर्षे काम केले आहे, त्यामुळे त्यांना या सर्व गोष्टींची कल्पना आहेच. तरीही ते असे काय करताहेत हे त्यांनाच ठाऊक असे सांगत, राजकीय विरोध बँकेवर काढू नये असा सूचक टोला अध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी घाडी यांना यावेळी लगावला!
