October 17, 2026

तुमच्या काळात वाळूचे हप्ते वसूल केला;: आता त्याच लोकांना वाळू चालू करून देतो म्हणता?; आमदार विठ्ठल हलगेकर!

0

. आ. डॉ. निंबाळकर यांच्या वक्तव्यावर  आमदार हलगेकरांचे प्रत्युत्तर;  रुमेवाडी मवाडीच्या लोकांनी रस्त्यावर भात कुणाच्या…


IMG_20260914_103821

. आ. डॉ. निंबाळकर यांच्या वक्तव्यावर  आमदार हलगेकरांचे प्रत्युत्तर;  रुमेवाडी मवाडीच्या लोकांनी रस्त्यावर भात कुणाच्या काळात लावले जरा विचार लोकांना…

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

       चार दिवसांपूर्वी माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर यांनी विकासकामांसाठी निष्क्रिय असल्याचा आरोप करत, तालुक्यात कोणताच विकास केला नसल्याचे वक्तव्य केले होते,  शिवाय आपण केलेल्या विकासकामांचा मागोवाही घेतला होता. या वक्तव्याचा समाचार घेत रविवारी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. तुम्हीं पाच वर्षात माझ्याशिवाय काहीच करायचे नाही, अशी खुमखुमी दाखवत वाळू वाहतूकदारांकडून किती हप्ते घेतला ते सांगा पहिल्यांदा आणि नंतर दुसऱ्याकडे बोट दाखवा. तालुका मोठा असल्याने कोणत्या आमदाराने किती विकास केला हे आम्हीं कधीच मोजत नाही. तुम्हीं आता बोललाच म्हटल्यानंतर आम्हालाही उत्तर द्यावे लागते, कोणीही जनतेची दिशाभूल करू नये असेही त्यांनी खानापूर येथील पक्षाच्या कार्यालयात बोलतांना स्पष्ट केले.

तुम्हीं आमदार असतांना वाळू हप्ते वसूल केला आणि आता त्याच लोकांना वाळू चालू करून देतो म्हणता?

     तुमच्या आमदारकीच्या काळात वाळू वाहतूकदारांकडून जबरदस्तीने हप्ते वसूल केला आणि आता पुन्हा वाळू सुरू करून देतो म्हणता, हे कशे शोभते तुम्हांला? प्रश्न आमदार विठ्ठल हलगेकर यांना व्हिडिओच्या माध्यमातून विचारला. मी कोणती कोणती कामे केलीत त्याची साक्ष खुद्द तालुक्यातील जनताच देईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले आमदार हलगेकर….

माझ्या तीन वर्षांच्या काळात तालुक्यात 150 रस्ते मंजूर केले आहेत, मंदिरांसाठी 12 कोटी रुपये मंजूर केले आहेत, 800 मजुरांना काम दिले आहे, अजूनही आमचे काम सुरूच आहे. असे असताना माजी आमदार जाणूनबुजून जनतेची दिशाभूल करत असल्याचा पलटवार आमदार विठ्ठल हलगेकर यांनी यावेळी केला.

शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना चालवतो; तुम्हीं केलेला 600 कोटींचा आरोप सिद्ध झाला?

   तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लैला शुगर्स (महालक्ष्मी) कारखाना चालवतो, कोणीही दाखवून द्यावे शेतकऱ्यांचे बिल थांबवले, कोणाला त्रास दिला असेल तर! तुम्हीं आमच्यावर केलेला 600 कोटींच्या आरोपाचे काय झाले? असाही टोला आमदार विठ्ठल हलगेकर यांनी लगावला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *