केंद्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत…
जांबोटी मराठी उच्च प्राथ. मराठी शाळेची समाधानकारक कामगिरी…

0
IMG_20260831_124346



क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा सुधारणा समितीचे मार्गदर्शन…

जांबोटी:  लोकहित न्यूज (विलास कवठणकर )

नुकतेच आमटेत पार पडलेल्या जांबोटी केंद्रीय ( विभाग) वार्षिक क्रीडा स्पर्धेत जांबोटी उच्च मराठी प्राथ. शाळेच्या विद्यार्थांनी यंदा समाधानकारक कामगिरी केली असून, सर्वच क्रीडा प्रकारात क्रमांकांची ‘मोहोर’ लावली आहे.


जांबोटी शाळेचा निकाल असा…
लांब उडी रोहित जाधव 6 वी दुसरा क्रमांक
400 मीटर धावणे लक्ष्मी गावडे 7 वी तिसरा क्रमांक, 400 मीटर धावणे ज्ञानेश्वर कोळपटे 6वी तिसरा क्रमांक, थाळी फेक प्रभात परमेकर 7वी तिसरा क्रमांक , मुलांचा खो -खो दुसरा क्रमांक, मुलांचा थ्रो बॉलमध्ये पाहिला क्रमांक, मुलांचा व्हॉली बॉल दुसरा क्रमांक,मुलींचा थ्रो बॉल दुसरा क्रमांक आला आहे.  या खेळाडूंना मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक सर्व सहशिक्षक आणि शाळा सुधारणा समितीचे सहकार्य लाभले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed