राज्यात बोगस डॉक्टरांची शोधाशोध; असे लोक दाखवून दिल्यास आरोग्य खात्याकडून बक्षीस जाहीर, तरीही आरोग्य खात्याकडून कठोर कारवाईची मागणी…
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
आजच्या धगधगत्या जीवनात डॉक्टर म्हणजे देवच मानले जाते पण, डॉक्टरी पेशाच्या नावाखाली कोणी गोरगरीब नागरिकांची फसवणूक करत असेल तर! असेच घडते आहे, खानापूरातील मोदेकोप- कान्सुली परिसरात नुसतेच सातवी शिकलेल्या एका काळे नामक व्यक्तीकडून बोगस डॉक्टरकीचे काळे कारणामा सुरू असल्याचा व्हिडिओ सोसियल मीडियावर वायरल होत आहे. त्यात ती व्यक्ती काहीं अज्ञान लोकांना बोगस आरोग्य सेवा देतांना दिसत आहे. त्यांच्यावर आरोग्य खात्याने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
त्या बोगस डॉक्टरांचा पडदाफास; सर्टिफिकेट दाखव म्हणताच बोलती बंद…
सदर बोगस डॉक्टराच्या ठिकाणी जाऊन त्याची डॉक्टर पदवी, शिक्षण याबद्दल विचारले असता, त्याची बोलतीच बंद झाल्याचे त्या व्हिडीओत दिसत आहे. पदवीचा सरळ उच्चारही त्या व्यक्तीला करता येईना असेही त्यात दिसत आहे.
आरोग्य खात्याचा अजब सल्ला,आरोग्य अधिकारी म्हणतात तक्रार द्या; नागरिक म्हणतात तुम्हीच शोध घेऊन कारवाई करा…
डॉक्टरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुक्यात आरोग्य खाते असून, तालुका आरोग्य अधिकारी आहे. त्यांच्या अधिकाराशिवाय पानही हलत नाही. असे असतांना आरोग्य अधिकारी डॉ. महेश किड्सनावर या घटनेची माहिती देवऱ्यानाच तक्रार देण्यास सांगतात, हे चुकीचे असून त्यांनीच अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कठोर कारवाई केली पाहिजे असे नागरिक सांगतात.
प्रतिक्रिया –
बोगस डॉक्टर नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असतील तर त्यांचा पडदाफास झालाच पाहिजे, आरोग्य खात्याने त्यांचा शोध घेऊन कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.
डॉ. डी. ई. नाडगौडा, अध्यक्ष तालुका डॉक्टर संघटना..