खानापुरात तहसीलदार कार्यालयावर मोर्चा; महाराष्ट्र सरकारने एक कमिटी स्थापन करावी, मोहन केसरेकर यांच्या दोन्हीं मुलांचे भविष्य सरकारने उज्वल बनवावे अशी मागणी….

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
सांगली जिल्ह्यातील कुपवाडमध्ये अत्यंत अमानुषपणे मूळचे हेब्बाळ येथील मोहन केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनिषा केसरेकर यांची हत्या राक्षसी प्रवृत्तीच्या अंतंकवाद्याने केली आहे, त्याला तात्काळ फाशी झालीच पाहिजे, तसेच कमिटी स्थापन महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येईल, तसेच दोन्हीं मुलांचे फक्त शिक्षणचं न पाहता, त्यांच्या भविष्याचा विचार करावा अशी मागणी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी काल खानापूर तसिलदार कार्यालयासमोर बोलतांना केली. केसरेकर यांना न्याय मिळालाच पाहिजे या मागणीसाठी गुरुवारी खानापुरात विविध संघटनांच्यावतीने निषेध मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य भाजप कमिटी सदस्य प्रमोद कोचेरी यांनी केसरेकर कुटुंबाला 11 हजाराची मदत करत निषेध नोंदवला . माजी आमदार अरविंद पाटील यांनी महाराष्ट्रात उदरनिर्वाहासाठी राहत असलेल्या खानापुरातील नागरिकांचे संरक्षण झालेच पाहिजे अशी मागणी केली. भाजप युवा नेते पंडित ओगले यांनी बोलतांना, आरोपीचे घर लिलाव करून त्यातून मिळणाऱ्या पैशे केसरेकर कुटुंबियांना घ्यावेत असे सांगितले. यावेळी अनेक मान्यवरांनी केसरेकर कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली, यावेळी लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील, गुंडू तोपीनकट्टी, प्रशांत लक्केबैलकर, प्रकाश गावडे, दत्ता कदम, नितीन पाटील तसेच हेब्बाळ गावकरी उपस्थित होते.