मुख्यमंत्र्यांकडे पत्राच्या माध्यमातून मागणी; तसेच आरोपीवर व्हावी कठोर कारवाई…
बंगळूर / खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
राष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी परिसरातील शांती कॉलनीत झालेल्या भीषण दंगलीत आणि चाकू हल्ल्यात मृत पावलेले बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हेब्बाळ येथील मूळ निवासी मोहन नागप्पा केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा मोहन केसरेकर यांच्या अनाथ झालेल्या मुलांच्या मदतीसाठी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी कर्नाटक सरकारकडे धाव घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची विनंती केली आहे.
घटनेची पार्श्वभूमी आणि पत्रातील मुद्दे…
*सांगली येथील कुपवाड एमआयडीसीच्या शांती कॉलनीत 15 ऑगस्ट रोजी झालेल्या अचानक झालेल्या दंगलीत व चाकू हल्ल्यात मोहन नागप्पा केसरेकर आणि त्यांची पत्नी श्रीमती मनीषा मोहन केसरेकर (वय ३७) हे दोघेही पती-पत्नी जागीच व उपचारादरम्यान मृत पावले.*
*मिरज येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना मोहन केसरेकर यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज निष्फळ ठरली.*
*एकाच कुटुंबातील कर्ते आई-वडील दंगलीत गेल्यामुळे त्यांची लहान मुले पूर्णपणे अनाथ झाली असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.*
*महाराष्ट्र राज्याचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मृत कुटुंबाला सर्वतोपरी न्याय मिळवून देण्याचे आणि मुलांच्या पालनाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले आहे.*
*अशा अत्यंत हलाखीच्या आणि दुर्दैवी परिस्थितीत, मानवतावादी दृष्टिकोन ठेवून कर्नाटक सरकारने मृत कामगारांच्या अनाथ मुलांच्या जीवनोपयोगी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मुख्यमंत्री रिलीफ फंडातून किंवा योग्य त्या माध्यमातून सढळहस्ते आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आर्त हाक आमदार विठ्ठल हालगेकर यांनी या पत्राद्वारे दिली आहे.