हेब्बाळ दुर्दैवी प्रकरण खानापूर तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून मोहन केसरेकर यांची विचारपूस….

मिरज: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
मूळचे हेब्बाळ (ता. खानापूर) येथील सध्या (रा. कुपवाड सांगली) मोहन नागो केसरेकर व त्यांच्या पत्नी मनिषा केसरेकर यांच्यावर कचऱ्यावरून खुनी हल्ला झाला त्यात मनिषा केसरेकर या जागीच मरण पावल्या तर मोहन केसरेकर हे मिरजेतील सरकारी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. सध्या ते आरसीयूमध्ये उपचार घेत असून, सध्या त्यांची प्रकृती सुधारत आहे. माजी आमदार तथा एआयसीसी सचिव सचिव डॉ अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या सुचनेनुसार सोमवारी (दि.17) दुपारी खानापूर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर कन्या मनाली केसरेकर व श्रीहरी केसरेकर यांचीही विचारपूस करून, सांगली जिल्हा पोलिस प्रमुख तुषार दोषी यांच्या केसरेकर यांच्या मुलांसमवेत भेट घेऊन आरोपी कारवाईबद्दल चर्चा केली. आरोपीला अधिकाधिक शिक्षा झाली पाहिजेत अशीच मागणी यावेळी काँग्रेस नेत्यांनी केली. यावर एसपी दोषी यांनी त्याच मार्गाने आमचा तपास सुरू असून, आरोपीवर कडक कारवाई होणारच अशी हमी दिली.
जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांचीही काँग्रेसकडून भेट…
सांगली एसपी तुषार दोषी यांची केसरेकर यांची कन्या मनाली केसरेकर यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी भेट घेत तपासाबद्दल माहिती घेतली. त्यावर एसपी दोषी यांनी केसरेकर कुटुंबियांना योग्य तो न्याय मिळेल, तसेच त्यांच्या मुलांना लागेल ते सहकार्य केले जाईल असेही ते म्हणाले. तसेच आमदार पडळकर यांच्याशीही यावेळी काँग्रेस नेत्यांनी चर्चा केली. माजी ग्राम पंचायत सदस्य यावेळी प्रसाद पाटील, साईश सुतार , संजय बावकर, म्हात्रू गुरव व सुरेश जाधव उपस्थित होते.