मंतुर्गा: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
मणतुर्गे गावातील प्रतिष्ठित बोबाटे घराण्यातील वयोवृद्ध मातोश्री श्रीमती कांचना मंगेश बोबाटे (वय वर्षे 85 )यांचे वृद्धापकाळी प्रदीर्घ आजाराने आज (शनिवार दि. 8 )पहाटे तीन वाजता दु:खद निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन कर्ते चिरंजीव, दोन विवाहीत मुली ,सुना ,जावई ,नातवंडे पणतवंडे ,जाऊ, पुतणे ,पुतणी,असा मोठा परिवार आहे. सूर्योदय ग्रुपचे सचिव तथा मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान खानापूरचे खजिनदार ,काँग्रेस कार्यकर्ते ईश्वर बोबाटे यांच्या त्या मातोश्री आहेत, त्यांच्या पवित्र आत्म्यास सदगती मिळो हीच भावपूर्ण श्रद्धांजली !अंत्यविधी आज दुपारी 12-30वाजता होणार आहे.