लोकहित न्यूज’कडे दिली माहिती; सोसायटी रुळावर आणण्याचा प्रयत्न आहे सुरू! पण, कुठपर्यंत? ठेवीदारांचा प्रश्न…
अशा सोसायट्यांचे करायचे तरी काय? भाग – 4
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
खानापुरातील नावाजलेली सोसायटी म्हणून समृध्दी मल्टी मल्टीपर्पज सोसायटीची ओळख आहे, पण अलीकडच्या काळात या सोसायटीत काय चालले आहे, सोसायटीची आर्थिक परिस्थिती काय आहे, ठेवीदारांच्या ठेवी मिळणार? की, नाही! कोटींच्या घरात अडकलेल्या ठेवी कशा देणार परत, सोसायटीचे ऑडिट (कायम) झालेले असल्याने अशा जिवंत आहेत अशी मानसिकता ठेवता येईलही कदाचीत, पण कधीपर्यंत? ! ठेवीदार म्हणतात, गेल्या दोन -तीन वर्षांपासून आम्हीं ठेवी द्या, अशी मागणी करत सोसायटीकडे कित्येकवेळा हेलपाटे मारले पण, कोणताच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आमच्या ठेवी मिळणार की नाही, या शंकेने आभाळाएवढे ‘रूप’ धारण केले आहे. यातून सावरायचे कसे? असे प्रश्न असतांनाच झाडअंकले येथील समाजसेवक नवनाथ होसुरकर यांनी आपल्या सहा लाखांच्या एफडी ( ठेवी) समृध्दी मल्टी मल्टीपर्पज सोसायटीत अडकून असल्याची माहिती ‘लोकहित न्यूज’ कडे दिली आहे…
50 हजारांच्या 6 एफडी (ठेवी), 6 वर्षात डबल’नुसार 6 लाख अडकून; नवनाथ होसुरकर यांची माहिती….
असे अनेक प्रश्न असतांनाच, झाडअंकले येथील समाजसेवक, सोसायटी संचालक नवनाथ होसुरकर यांनी समृध्दी मल्टी मल्टीपर्पज सोसायटीच्या खानापूर शाखेत 50 हजारांच्या 6 एफडी (ठेवी), 25 / 8/2020 साली ठेवल्या होत्या, त्यांची 25 / 2/ 2026 ही परत फेडीची तारीख आहे, 50 हजारांच्या 6 एफडी (ठेवी) , समृध्दी सोसायटीच्या 6 वर्षात डबल या योजनेनुसार एफडी (ठेवी) ठेवल्या आहेत, त्यांची 25 /2/2026 ही परत फेडीची अर्थात 50 हजारांच्या 6 ठेवींचे डबल नुसार 6 लाख मिळणे अनिवार्य होते. पण, ही तारीख संपून 4 6 महिने उलटले तरी सोसायटीकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचे ठेवीदार नवनाथ होसुरकर यांनी लोकहित न्यूज कडे सांगितले.. मी अनेकवेळा सोसायटीत फेऱ्या मारल्या तरी त्यांच्याकडून कोणतेच ठोस उत्तर मिळत नसल्याचेही ते पुढे बोलतांना म्हणाले….

