चर्चेचा विषय; केंद्र सरकारच्या पेट्रोल बचतीच्या आवाहनाला तहसिलदारांकडून प्रतिसाद?
-लक्षवेधी न्यूज –
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
सरकारी वाहन असताना तालुका दंडाधिकारी तथा खानापूरचे तहसीलदार दुण्डप्पा कोमार यांनी आज दुपारनंतर चक्क दुचाकीवरून तहसील कार्यालयात दाखल झाले, त्यावेळी उपस्थित नागरिकांच्या हा चर्चेचा विषय ठरला. सामाजिक कार्यकर्ते जोतिबा भेंडीगेरी यांनी तहसीलदारांचा तो फोटो काढून ‘लोकहित न्यूज’ कडे पाठवला. मागच्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल बचतीचे कानमंत्र देशवासीयांना दिले होते, त्या आवाहनाला तहसिलदारांकडून आज प्रतिसाद दिला गेल्याची चर्चा जोतिबा भेंडीगेरी यांनी लोकहित न्यूज शी केली.
याबाबत तहसीलदार दुण्डप्पा कोमार यांना लोकहित न्यूज ने विचारले असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दुपारी अडीचच्या सुमारास तहसीलदार दुचाकीवरून तहसील कार्यालयात दाखल झाले. तहसील कार्यालयातील तालुक्यातील नागरिकांची अनेक कामे वेळेत होत नाहीत, त्यामुळे त्यांना अनेकवेळा खेटे मारावे लागतात. याबद्दल तहसीलदारांनी मोहीम राबवून नागरिकांच्या कामांचा वेळेत निपटारा करून द्यावा अशी मागणी तालुकावासियांतून होत आहे.
