July 21, 2026

ओलमणीजवळील कोसळलेल्या ‘ त्या’ मोरीची तात्काळ दुरुस्ती करा

0

आमदारांची तालुका बांधकाम खात्याचे अधिकारी संजय गस्ती यांना सूचना…     जांबोटी: लोकहित न्यूज ( विलास…


IMG_20260713_220758

आमदारांची तालुका बांधकाम खात्याचे अधिकारी संजय गस्ती यांना सूचना…

   

जांबोटी: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)

        जांबोटी -खानापूर रोडवरील ओलमणीजवळील मोरी कोसळून आठवडा उलटला तरी अद्याप सदर मोरीच्या दुरुस्तीबाबत कोणत्याच हलचाली होऊ शकल्या नाहीत. याची माहिती स्थानिक भाजप कार्यकर्ते दौलत कोलीकर यांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांना दिली अन् लागलीच आमदारांनी याची दखल घेत तत्काळ सदर मोरीच्या दुरुस्तीचे काम हाती घ्या असा आदेश तालुका बांधकाम खात्याचे अधिकारी संजय गस्ती यांना दिला आहे. त्यामुळे लवकरच हे काम मार्गी लागेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

धोकादायक मोरीच्या ठिकाणी कोणत्याही क्षणी अपघाताची भीती…

    ओलमणीजवळ अगदी वळणाच्या ठिकाणी लहान नाक्यावरील मोरी कोसळली असून, त्याचबाजुला घाट आहे, शिवाय हा रस्ता अरुंद असल्यामुळे दोन्हीं वाहनांना बाजू देतांनाच अपघात घडण्याची भीती आहे. त्यामुळे तत्काळ सदर मोरीची दुरुस्ती करून उद्भवणारा धोका टाळावा अशी मागणी स्थानिकातून केली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *