हर हर महादेवाच्या ‘गजरात’ बैलूर लक्ष्मीच्या अक्षता; आजपासून नऊ दिवस यात्रा!


आमदार विठ्ठल हलगेकर दांपत्याचाहस्ते विधिवत पूजन, मा. आ. अरविंद पाटील, लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील, विलास बेळगावकर यांची विशेष उपस्थिती!

      बैलूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

           गेल्या वर्षभरापासून जांबोटी पश्चिम भागाला उत्सुकता लागून राहिलेल्या बैलूर,देवाचीहट्टी, बाकनुर, मोरब गावच्या लक्ष्मी देवीचा अक्षतारोपनाचा कार्यक्रम पार पडला. श्री पवनाई मंदिराकडून देवीचे विवाहस्थळी आगमन झाले, मात्र, दिलेल्या वेळेनुसार विवाह पार पडला नसल्याने भाविकांना तीन तास वाट पहावी लागली. 6. वाजून 45 मिनिटे यावेळेत ठरलेला विवाह साडे दहाच्या दरम्यान पार पडला. यावेळी खानापूरचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर व त्यांच्या पत्नी रुक्मिणी हलगेकर यांनी सुरवातीपासून हजेरी लावली, त्यांच्याचहस्ते देवीचे विधिवत पूजन, हार देवाणघेवानचे कार्य पार पडले. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, विलास बेळगावकर, भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, भैरू पाटील, भाजप नेते मारुती पाटील, युवा नेते दौलत कोलीकर, पवन गायकवाड, मंगेश मुळीक, कृष्णा भरणकर, ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर, दीपक कवठणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

               यावेळी विधिवत पद्धतीने विवाह सोहळा पार पडला, श्री लक्ष्मी ही देवाचीहट्टी गावातील बाबू कुंभार यांच्या कुंभार घराण्यातील कन्या असल्याने सुरेश कुंभार, सुजाता कुंभार, केदार कुंभार, जोतिबा कुंभार,बाबू कुंभार, तुकाराम कुंभार, संतोष कुंभार यांच्यासह देवाचीहट्टी गावकऱ्यांच्याहस्ते कन्यादान करण्यात आले. यावेळी बैलूरच्या भोमानदारांनी धार्मिक कार्यक्रम विधिवत पद्धतीने पार पाडले, यावेळी देवस्थान देवस्थान कमिटीचे पांडुरंग गुरव, पुंडलिक नाकाडी, लक्ष्मण झांजरे, दामोदर नाकाडी, करणसिंह सरदेसाई, मंगेश गुरव, सी. एम. पाटील, चंद्रकांत बिर्जे, कृष्णकांत बिर्जे, राजू कांबळे, सिद्धाप्पा नाकाडी, रवळु गुरव, गिर्माजी गुरव यांच्यासह सर्व कमिटीचे पदाधिकारी व पंच कमिटी, देवाचीहट्टी, बाकनुर, मोरब गावचे हक्कदार व गावकरी भक्त उपस्थित होते.

देवीचे लगीन अन् अती सोनेरी क्षण...

      तब्बल 15 वर्षांनंतर होत असलेल्या देवाचीहट्टी, बैलूर, मोरब, बाकनुर गावच्या लक्ष्मी यात्रेने संपूर्ण भागातच नवचैतन्य निर्माण झाले असून, सर्व भाग भक्तीसागरात बुडाला आहे. यावेळी देवीचे लगीन म्हणजे एक सोनेरी क्षणच होता. प्रचंड गर्दी असतानाही उशिरा का असेना पण, विवाह सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यात आले होते . भंडाऱ्याने न्हाऊन गेलेल्या भाविकांची मोठी उपस्थिती असूनही अगदी व्यवस्थित विवाहसोहळा पार पडला. एरवी उष्णतेची लाट असताना आज मात्र, सूर्यानेही थंड वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे प्रसन्नतेचे वातावरण होते. लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंतचे नागरिक या सोनेरी क्षणाचे साक्षीदार बनले.   लोकहित न्यूज तर्फे सर्व भाविकांना यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा…

 

चार तास गावातून निघणार देवीचा मिरवणूक; 3 वा. बसणार देवी गदगेवर!

         देवीच्या अक्षता पडल्यानंतर 11 ते 3 यावेळेत गावातून देवीची मिरवणूक निघणार आहे, त्यानंतर 3 वाजता लक्ष्मी देवी गदगेवर बसणार असून, भाविकांना दर्शन मिळेल. मोठ्या प्रमाणात ही यात्रा भरणार असून, लाखों भाविक उपस्थित रहाण्याचा अंदाज आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *