स्थानिक व आजुबाजूच्या खेड्यातील नागरिकांनी नोंद घेण्याचे जांबोटी गावकऱ्यांच्यावतीने आवाहन ….
जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
पश्चिम भागाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांबोटीगाव आणि बसस्थानक बाजारपेठ उद्या ( शुक्रवार दि. 10) पूर्ण दिवस सर्व व्यवहारासह, दुकाने बंद राहणार आहे . स्थानिक नागरिक, आजुबाजूच्या खेड्यातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे जांबोटी गावकऱ्यांतर्फे कळविण्यात येत आहे.
वार्षिक वार ; राजवाडा जांबोटीत 5 वार पाळले जाते….
वर्षातून पाच वार पाळले जातात, राजवाडा जांबोटीत पाच वार पाळले जातात. जांबोटीरामापूर बाजारपेठ ही भागाची बाजारपेठ असून, आजुबाजूच्या गावातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाचपैकी एक वार बंद म्हणून पाळला जातो. तो वार म्हणजे शुक्रवार आहे. याला पूर्वीपासूनची परंपरा लाभली आहे…






Leave a Reply