ग्रा. पं. सदस्य प्रदीप कवठणकर यांच्या घराच्या मागे घाडपान; शंभर टक्के गावातीलच कोणी तरी हा प्रकार केल्याची माहिती!
देवाचीहट्टी : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
अलीकडे जांबोटी भागातील हब्बनहट्टी, देवाचीहट्टी परिसरात अंधश्रद्धेचे प्रकार वाढले असून, हब्बनहट्टी क्रॉस, देवाचीहट्टी बैलूर क्रॉसवर हमकास आठवड्यातून एकदा तरी घाडपान केलेलेच असते! देवाचीहट्टीत तर हा प्रकार जोरात होत असतो, परवा या गावात गावच्या देवाचा धार्मिक कार्यक्रम करण्यात आला, साधारण त्याच दिवशी या गावचे ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर यांच्या घराच्या मागे नारळावर घाडपानचा प्रकार उघडकीस आला. प्रदीप यांचे वडील गोपाळ कवठणकर यांनी काही कामानिमित आपल्या परड्यात (परसू) गेले असता, त्यावेळी हा प्रकार नजरेस दिसून आला. याविरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याची माहिती प्रदीप कवठणकर यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली.
शरण येण्यासाठी हा प्रकार घडला केला आहे…
चार वर्षापूर्वी देवाचीहट्टी गावच्या सार्वजनिक उत्सवातील दोघांचा धार्मिक विधी, नारळ फोडणेसह देवस्कीची कामे करणे येथील भोमानदारांनी वैयक्तिक कारणासाठी बंद केले आहे. त्यात चार दिवसापूर्वी गावातील थळाचा धार्मिक विधी पार पडला. त्याच दिवशी किंवा त्याच्याआधी ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर यांच्या घराच्या पाठीमागे बांबूच्या बेटामध्ये नारळ घाडपान केले आहे. शुक्रवारी प्रदीप यांचे वडील गोपाळ कवठणकर यांच्या निदर्शनास आले. लागलीच हा प्रकार गावचे प्रतिष्ठित नागरिक सखाराम धुरी, हणमंत गावडे, पत्रकार विलास कवठणकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद धुरी, परशराम गावडे यांना हा प्रकार प्रदीप कवठणकर यांनी दाखवला!

या प्रकाराविरोधात पोलिसात तक्रार करणार; चौकशी होणार!
याबाबत लोकहित न्यूजने ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर यांच्याशी चर्चा केली असता, ते म्हणाले मी नवीन सदस्य झाल्यानंतर काहीं दिवसांतच माझ्या घराच्या मागे असाच प्रकार केला होता, त्याच लोकांनी पुन्हा असा प्रकार केला आहे, त्याविरोधात पोलिसात करणार असून, याची चौकशी करणार असल्याची माहिती प्रदीप कवठणकर यांनी दिली. जांबोटी पोलिस आउटपोस्ट याची माहिती देण्यात आली असून, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून घेण्याची हमी सीपीआय साहेबांनी दिली आहे.

याआधी गावात काहीं असे प्रकार घडल्याची माहिती…
विनोद धुरी यांच्या ट्रॅक्टराखाली कोणी लिंबू घाडपान केले होते, तर अलीकडेच गावचा गावडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परशुराम गंगाराम गावडे यांच्या शेतात प्लॅस्टिक भरणीत घाडपान करून ती भरणी झाडाला टांगली आहे. काय हे प्रकार किती ही अंधश्रद्धा… या विरोधात सरकार आणि पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.






Leave a Reply