अरविंद पाटलांची ‘टीम’ लागली आमटे कृषी पत्तीनच्या तयारीला….


आतापासूनच तयारी सुरू; विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर गटाची तयारी काय????

     

जांबोटी:लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

           चापगाव, जांबोटीनंतर आता आमटे कृषी पत्तीन निवडणुकीच्या तयारीसाठी अरविंद पाटील यांची टीम लागली आमटे कृषी पत्तीनच्या तयारीला, तर दुसरीकडे सत्ताधारी अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर यांची मात्र, तयारी काहीच दिसेना! काल रात्री कालमनीत यापैकी कुणाची तरी गुप्त बैठक आणि फेरफेरी झाल्याची माहिती लोकहित न्यूजकडे मिळाली आहे.. त्यामुळे हेही राजकारण चांगलेच घुमण्याचे चिन्हं दिसत आहे.

डीसीसी वचपा काढण्यासाठी पाटील आणि कसर्लेकर यांच्यात पडणार झुंज….

      गेल्या तीन महिन्यापूर्वी पार पडलेल्या डीसीसी (मध्यवर्ती बँक) बँकेच्या निवडणुकीत अरविंद पाटील यांचा विरोधात आमटे कृषी पत्तीनचे अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर यांनी हट्टीहोळी यांच्या बाजूने जोरदार प्रचार केला होता. लक्ष्मण कसर्लेकर यांचे संचालक फोडण्यात अरविंद पाटील यशस्वी झाले, पण एकमेकातील राजकारणिक राग अद्याप तरी कमी झालेला दिसत नाही! त्याच आता अरविंद पाटील यांनी निवडणुक लांब असतानाच आधीच आपल्या कार्यकर्त्यांना रणांगणात उतरविल्याने, आणखीच राजकारणतापण्याचे चिन्हं दिसून लागले आहे.

पण, तरीही दोघे हे कधी ‘राम -लखन’ होतील याचाही नेम नाही!

      माजी आमदार अरविंद पाटील आणि आमटे कृषी पत्तीनचे अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर हे दोघेही एकेकाळचे जवळचे मित्र! त्यामुळे अधून मला ते राजकीय गरजेसाठी कधी? त्यांच्यात गुप्तगु होईल हेही सांगणे कठीण. मध्यंतरी म्हणजेच मागचे आमटे कृषी पत्तीनचे इलेक्शन या दोघांनी गाजवले होते, पण मध्येच ते एकत्र दिसले. जुन्या त्या दोघांची जुनी ओळख केंव्हा नवी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे हे दोघे राम लखनची भूमिका कधी घेतील हेही सांगता येणे कठीण आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *