जांबोटी राजवाडा रस्त्याचे काम सुरू!


मंगळवारी जेसीबीचे काम सुरू झाले; बुधवारपासून पुढील काम सुरु होणार..

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

         लोकहित न्यूजच्या दणक्यानंतर अखेर जांबोटीराजवाडा रस्त्याचे काम मंगळवारी सुरु झाले, जेसीबीने रस्ता उखडण्याचे काम सुरु होते, बुधवारपासून पुढील कामाला सुरुवात होणार आहे. तीन महिने हे काम रखडले होते, गावकऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर पुन्हा या कामाला गती येणार आहे. मंगळवारी जेसीबीचे काम सुरू असताना, ग्राम पंचायत सदस्य बाळकृष्ण जांबोटकर, माजी ग्राम पंचायत सदस्य शंकर सडेकर, देवाचीहट्टीचे ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर, डॉ. महेश जांबोटकर, विश्वनाथ घाडी, राजकुमार देसाई यांच्यासह गावचे युवक उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *