धनश्री सरदेसाई यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद; कोणत्या प्रकरणाचा भांडाफोड करणार??…


जांबोटी कृषी पत्तीमध्ये माजी अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांचा निसटता पराभव; मार्केटींग आणि डीसीसीतील वचपा अजूनही निघेना???

जांबोटी -खानापूर / : लोकहित न्यूज (विलास कवठणकर )

      नुकत्याच पार पडलेल्या अटीतटीच्या जांबोटी कृषी पत्तीनसाठी झालेल्या निवडणुक,निकाल पार पडून आठवडा उलटत आला तरी ‘बदला राजकारण’ अद्याप गरमच आहे. त्याचच एक भाग म्हणून काही वेळात जांबोटी कृषी पत्तीनच्या मावळत्या अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांनी तालुका भाजप कार्यालयात पत्रकार परिषद बोलवली आहे. त्यामध्ये त्या कोणत्या प्रकरणाचा भांडाफोड करणार?  आज सकाळी त्यांनी लोकहित न्यूजशी संपर्क साधून पत्रकार परिषदेत येण्याचे आवाहन केले आहे. जांबोटी भागामध्ये मोठा घोटाळा झाला असून, त्याचा लवकरच मी भांडाफोड करणार आहे, अशी सूचक माहिती  धनश्री सरदेसाई यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली होती. कोणत्या प्रकरणाबद्दल? मार्केटींग की, डीसीसीबद्दल ही माहिती असेल हे थोड्या वेळातच कळेल…

      

आज सकाळी अकरा वाजता ही पत्रकार परिषद होईल…

     खानापूर तालुका भाजप कार्यालयात जांबोटी कृषी पत्तीनच्या मावळत्या अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांनी आज सकाळी अकराच्या दरम्यान पत्रकार परिषद बोलवली असून, यावेळी तालुक्यातील प्रिंट, वेबपोर्टल, यूट्यूब चॅनलचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *