भोंदू अशोक खरातशी जवळीक भोवली; महिला आयोगापाठोपाठ पक्ष अस्तित्वही धोक्यात??
मुंबई/पुणे : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
आजकालचे राजकारण म्हणजे एकीकडे व्यक्तीचे नशीब बनते आणि वेळ पडली तर नशीब नाहीशेही होते, असेच सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नुकत्याच भोंदू बाबा अशोक खरात यांच्याशी जवळीक असल्याच्या आरोपावरून पायउतार झालेल्या रूपाली चाकणकर यांचे आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदही काढून घेण्यात आले असून, याआधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून त्यांना हटवण्यात आले. आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदही काढून घेतले आहे. जरी दोन्हीं पदे काढून घेतली तरी चाकणकर या खरात यांच्या शिवनिका देवस्थान नासामध्ये संचालिका असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायमच राहणार आहे.
कोण आहेत या चाकणकर अन् त्याची इथपर्यंत मजल कशी….?
राष्ट्रवादीच्या पाभावी नेत्या चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, वाघ यांच्यासारख्या नेतृत्वाची कमी होती, अशावेळी एक तरुण ,तेजस्वी म्हणून पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि नंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली. त्याच काळात पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे खून प्रकरण जोरात सुरू होते आणि त्यात रूपाली चाकणकरांचा समावेश असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. अशातच पक्षाच्या जोरावर हे सर्व काहीं काळ चालले होते, मात्र, भोंदू अशोक खरातच्या प्रकरणामुळे अखेर त्यांच्या राजकारणाला पूर्णविराम लागला असल्याचे राजकीय वर्तुळात दिसून येत आहे.
माझा त्या गैर कृत्यांशीं काहीही संबंध नाही; चौकशीनंतर काय ते सत्य समोर येईलच: रूपाली चाकणकर….
भोंदू बाबा अशोक खरातशी माझी जवळची ओळख असली तरी त्याच्या त्या काळया गैरकृत्यांशी माझा काहीही संबंध नाही, चौकशीनंतर सत्य काय ते समोर येईलच, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर रूपाली चाकणकरांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली. राजकीय हेतूने मला यात गोवण्यात आले असून, याची निःपक्ष चौकशी झाली पाहिजे अशाही त्या पुढे बोलतांना म्हणाल्या…






Leave a Reply