ओलमणी शाहु हायस्कूलच्या विद्यार्थांना ‘अग्नी प्रतिकार’ प्रात्यक्षिक…


अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी हायस्कूलला भेट देऊन दिली माहिती; शाळा सुधारणा कमिटी मुख्याध्यापक सहशिक्षकांची उपस्थिती….

ओलमणी : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

       आजकाल उत्तम शिक्षणाबरोबर विद्यार्थांचा सर्वांगीण विकासही मोलाचा आहे, भोवतालच्या परिस्थितीचे  ज्ञान असणे गरजेचे बनले आहे. तरच आजचे विद्यार्थी उद्याचे समजदार नागरिक बनतील. त्यादृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे, आजचे अग्नी प्रतिकार प्रात्यक्षिक आजचा हा उपक्रमही एक विद्यार्थांसाठी अनुभवच होता असे मत ओलमणी शाहु हायस्कूलचे शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष तुकाराम साबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना व्यक्त केले. शनिवारी ओलमणी शाहु हायस्कूलमध्ये तालुका अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी हायस्कूला भेट देऊन अग्नीबाबत पूर्ण खबरदारी, आग लागण्याची कारणे, आपत्कालीन परिस्थितीत काय करावे, अग्नीशमन दलाच्या यंत्रांचा कसा वापर करावा याबद्दल माहिती सांगण्यात आली. तसेच काहीं प्रात्यक्षिके प्रत्यक्षात करुन दाखवण्यात आली. यावेळी  अग्नीशमन दलाचे तालुका प्रमुख शिवानंद अंकलगी, सुनिल सीमनगौडर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक सी वाय कदम त्यांचे सर्व सहकारी शिक्षक, शाळा सुधारणा कमिटी सदस्य व सर्व विद्यार्थी उपस्थित होते..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *