ऑडिट रिपोर्ट सादर करण्यास अपयश, राज्य सरकारच्या अटींचा भंग केल्याचा ठपका; सध्या तरी गोव्यातील विस्ताराला लागला ब्रेक..

पणजी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
वार्षिक ऑडिट रिपोर्ट दाखवण्यास अपयश तसेच सरकारी अटींचे पालन न केल्याप्रकरणी बहुचर्चित तिरुमला तिरुपती मल्टिस्टेटच्या गोव्यातील 13 शाखांना दिलेली एनओसी सहकार खात्याने मागे घेतल्याने सध्या तरी या सोसायटीच्या गोव्यातील विस्ताराला ब्रेक लागला आहे. गोव्यात तिरुमला तिरुपती मल्टिस्टेटच्या सध्या 17 शाखा कार्यरत आहेत. नुकतेच या सोसायटीने विस्ताराच्या दृष्टीने पुढील पाऊल टाकले होते. मात्र, पुढील विस्तार राज्य सहकार खात्याच्या नियमांमध्ये बसत नसल्याने सहकार निबंधक आशितोष आपटे यांनी निर्णय घेतला असून, तसे केंद्रीय केंद्रीय निबंधकांना कळविण्यात आल्याचेही आपटे यांनी स्पष्ट केले आहे. गोव्यातील माशेल महिला सहकारी बँक, व्हिजनरी सहकारी बँकेच्या गैरव्यवहारामुळे या बँकांतील ठेवीदारांच्या कोटींच्या ठेवी बुडाल्या आहेत. आधीच अशा या गैरव्यवहारांना आळा घालण्यास सहकार खात्याला अपयश आलेले असताना त्यात नवीन सहकारी बँक सोसायट्यांच्या शाखा उघण्याचे काम जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर तिरुमला तिरुपती मल्टिस्टेटच्या 13 शाखा उघडण्यास दिलेली मान्यता मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
कोणत्या त्रुटींमुळे सहकार खात्याने हे पाऊल उचलले?…
कायद्यानुसार आवश्यक असलेला अहवाल सादर केला नाही, कागदपत्रांची तपासणी व पाहणीवेळी सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले नाही, ना हरकत पत्र अर्थात (एनओसी) नुसार अटींचे पालन केले नाही, सहकार निबंधकांनी दिलेल्या नोटीसला प्रतिसाद दिला नाही, यासाठी सहकार खात्याने चौकशीला बोलावले असता, हजर न राहणे ! अशा त्रुटींमुळे ही कारवाई केल्याचे स्पष्ट होत आहे.
तिरुमला तिरुपती मल्टिस्टेटविषयी माहिती अशी….
तिरुमला तिरुपती मल्टिस्टेटची बहुराज्य सोसायटी म्हणून 2002 मध्ये स्थापना झाली असून, मुंबईत त्यांचे मुख्य कार्यालय आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यामध्ये त्यांच्या शाखा आहेत. या सोसायटीमध्ये 1,645 कोटींच्या ठेवी आहेत. गोव्यात मडगाव, केपे, फोंडा, म्हापसा, काणकोण, कळंगुट, तीस्क, उसगाव आदी ठिकाणी शाखा आहेत. यात महत्वाचे म्हणजे सध्या गोव्यात सुरू असलेल्या सहकार खात्याच्या कारवाईचा कोणताही परिणाम या शाखांवर होणार नसल्याची माहिती समोर येत आहे…
व्हिजनरी सहकारी बँकेच्या गैरव्यवहारामुळे 11 हजार ठेवीदारांना बसला फटका…
दक्षिण गोवा माशेल महिला सहकारी सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, व्हिजनरी सहकारी बँकेच्या गैरव्यवहारामुळे 11 हजार ठेवीदारांना फटका बसला असून, कोटींच्या ठेवी बुडाल्या आहेत. हे प्रकरण विधान भवनासह कायदेशीर चौकटीत सुरू आहे, काहीं ठेवीदारांच्या ठेवी सरकारकडून मिळवून देण्यात आल्या तरी अद्याप मोठ्या ठेवी अडकून असल्याची परिस्थिती आहे…
बेळगांव -खानापूरतही काहीं सोसायट्या बुडाल्या; काहीं सोसायट्या अध्यक्ष संचालकाच्या मनमानीमुळे बुडण्याच्या मार्गावर, ठेवीदारांनी सावध राहण्याची गरज…
बेळगांव, खानापूर मध्येही काहीं सोसायट्या बुडाल्या असून, गोर गरीबांच्या कोटींच्या ठेवी बुडाल्या आहेत, शिवाय सध्याच्या घडीला काहीं सोसायट्या संचालकांच्या मनमानीमुळे बुडीत जाण्याच्या मार्गावर आहेत, त्यावेळी ठेवीदारांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.. बुडलेल्या सोसायट्यांमध्ये अडकलेल्या ठेवी सरकारने मिळवून देण्याची मागणी ठेवीदारांतून होत आहे..
प्रतिक्रिया
दरवर्षी आम्हीं सर्व सोसायट्या, बँकांचा ऑडिट रिपोर्ट मागवतो, त्यानुसार तिरुमला तिरुपती मल्टिस्टेटने आपला ऑडिट रिपोर्ट सादर केला नाही, आमचे अधिकारी त्यांच्याकडे चौकशीला गेले असता, त्यांना कोणतेही सहकार्य केले नाही. आम्हीं दिलेल्या नोटीसला त्यांनी उत्तर दिले, शिवाय चौकशीसाठी आमच्या कार्यालयात बोलावले असता त्यांनी हजर राहू शकले नाहीत, त्यामुळे नव्याने इतरत्र शाखा उघण्यास दिलेली मान्यता रद्द केली..
–आशितोष आपटे, सहकार खात्याचे निबंधक…






Leave a Reply