बडाल अंकलगीतील 40 एक्करातील दहा हजार झाडांची कत्तल ; उद्यापर्यंत संबंधितांवर कारवाई न झाल्यास ‘डीएफओ’ ऑफिसला घेराव घालण्याचा भाजप नेते धनंजय जाधव यांचा इशारा..


बेळगांव ग्रामीण भाग म्हणजे बेकायदेशीर ‘बिहार’ जाधव यांचा आरोप…

बेळगांव : लोकहित न्यूज ( विलास कवठणकर )

       बडाल अंकलगी (ता. बेळगांव) येथील श्री कौरीगुडा रेणुका देवी देवस्थान जवळील सोलार प्रकल्पाच्या नावाखाली  40 एक्करातील चंदनसह तब्बल 10000हजार विविध झाडांची बेसुमार कत्तल केली असून, यासाठी वनखात्याची परवानगी नसताना हे बेकायदेशीर कृत्य करण्यात आले आहे, याला कोणत्या राजकीय व्यक्तीचा समावेश आहे हे पहावे लागेल. एखाद्या गोर गरीब शेतकऱ्यांने एखादे झाड तोडले तर त्यांच्यावर कलमांचे गुन्हे नोंद करण्यात येतात. शिवाय एकही झाड तोडायचे म्हटल्यास वनखात्याची परवानगी आवश्यक असते. बडाल अंकलगीतील चंदनसह 10000 विविध प्रकारच्या झाडांची बेसुमार तोड करण्यात आली आहे, यासाठी परवानगी लागत नाही का? असा संतप्त सवाल उपस्थित रेंजरना माजी भाजप जिल्हा मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. त्यानंतर लागलीच जाधव यांच्याकडून वनखाते अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. उद्यापर्यंत असे बेकायदेशीर करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास दोन दिवसात डीएफओ कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा धनंजय जाधव यांनी वनखात्याला दिला आहे.

   

         

काय आहे हे प्रकरण….

     बडाल अंकलगी येथील 40 एक्करातील चंदनसह विविध प्रकारच्या सुमारे 10000 झाडांची बेसुमार तोड करण्यात आली आहे. यासाठी लागणारी परवानगी तहसिलदार जिल्हाधिकाऱ्यांनी डोळे झाकून दिली का? असा सवाल धनंजय जाधव यांनी केला आहे. चंदनासारखी झाडे मुळासकट काढण्यात आली आहेत. याची माहिती मिळताच बेळगांव मंडळ भाजप माजी अध्यक्ष धनंजय जाधव यांनी घटनास्थळी जाऊन वनखाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. यावर त्यांच्याकडे कोणतेच उत्तर नव्हते!

बेळगांव ग्रामीण भाग म्हणजे गुन्हेगारीचे बिहार बनले आहे: धनंजय जाधव….

     बेळगांव ग्रामीण भागात सर्वत्र बेकायदेशीर धंदे, गैरव्यवहार, दादागिरीचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यांना कोणाचा पाठिंबा आहे याची सर्वांना माहिती देण्याची गरज नाही, माहितच आहे. याविरोधात आवाज उठवण्यात येईल असेही जाधव यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *