यासंदर्भात जिल्हा पंचायत सभागृहात मंत्री, आमदारांच्या उपस्थितीत तयारीची बैठक पडली पार: अंतिम टप्यात असणाऱ्या या प्रकल्पाचे 19 जानेवारीला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते होणार उद्घघाटन….
नंदगड : लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)
नंदगड (ता.खानापूर) येथील ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतीवीर संगोळी रायण्णा स्मृती स्थळाच्या ठिकाणी सुरू असलेल्या वीरभूमी संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात असून, सांस्कृतिक मंत्री शिवराज तंगडगी आणि तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सदर प्रकल्पाची आज पाहणी करून कामाचा आढावा घेतला. साधारण 80 कोटींच्या घरात खर्च अपेक्षित असलेल्या या वीरभूमी संग्रहालयाचे 19 जानेवारी रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते उद्धघाटन होणार असून, यावेळी संबंधित खात्याचे खात्याचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अध्यक्षेतखाली पार पडणार आहे. आज मंत्री व आमदारांनी या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी तालुका अधिकारी, दिपक कवठणकर, महंतेश राऊत, सावित्री मादार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारीही उपस्थित होते.
आज जिल्हा पंचायत सभागृहात मंत्री, आमदारांच्या उपस्थितीत तयारीची पार पडली बैठक…
नंदगड येथील क्रांतीवीर संगोळी रायण्णा वीरभूमी संग्रहालयाचे 19 जानेवारी रोजी थाटात उद्घघाटन होणार असून,मुख्यमंत्र्यांच्याहस्ते याचे उद्घघाटन होणार आहे. त्या कार्यक्रमाच्या तयारीची नुकतीच बैठक जिल्हा पंचायत सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी सांस्कृतिक मंत्री शिवराज तंगडगी होते. व्यासपिठावर आमदार विठ्ठल सो. हलगेकर, जिल्हाधिकारी महमद रोशन, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे, जिल्हा पोलीस प्रमूख रामराजन यांच्यासह संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

प्रकल्पाचा आढावा घेताना मंत्री शिवराज तंगडगी, आमदार विठ्ठल हलगेकर व अधिकारी…






Leave a Reply