‘लोकहित न्यूज’चा दणका – देवाचीहट्टीतील ‘त्या’ नुकसानग्रस्त रताळी पिकाची वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी…


फॉरेस्ट गार्डकडून भरपाई मिळवून देण्याची शेतकऱ्यांना हमी; फॉरेस्ट खाते हत्तींच्या मागावर…

देवाचीहट्टी: लोकहित न्यूज

    देवाचीहट्टीतील नुकसानग्रस्त त्या रताळी पिकाची वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. लोकहित न्यूज ने याबाबत आवाज उठवला होता, त्याची दखल घेत वनखात्याने तात्काळ पाहणी केली आहे. याबद्दल लोकहित न्यूज चे शेतकऱ्यांकडून अभिनंदन केले जात आहे. बैलूर बीटगार्ड व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज सकाळी शेतात येऊन पाहणी केली. अर्ज करा भरपाई तत्काळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी हमी नुकसान ग्रस्त शेतकरी विनोद धुरी यांना दिली.

हत्तींचा कळप बैलुरच्या दिशेने; वनखाते त्यांच्या मागावर…

       हत्तींचा कळप बैलुरच्या दिशेने जंगलात घुसला असून, पुढेही त्यांच्याकडून मोठी नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनखाते त्या कळपाच्या मागावर आहेत. परिणामी 12 हत्तींच्या कळपाला पितळणार कसे? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *