राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्यासह नेत्यांची बंद खोलीत चर्चा सूरू; काहीं वेळातच तोडगा निघण्याची शक्यता…
बंगळूर : लोकहित न्यूज नेटवर्क ( विलास कवठणकर)
राज्यात पेटलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के.शिवकुमार यांच्यातील मुख्यमंत्री पदावरून राजकरणाला वेगवेगळे वळण लागत आहे. डीकेसी आणि सिद्धरामय्या यांचे दोन्हीं गट एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. दोघांचा वाद फारच विकोपाला गेल्यामुळे हायकांडला दोघांनाही बाजुला सारुन पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची ‘माळ ‘ पडणार यावर दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी बंगळूरात खासदार राहुल गांधी, राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह हायकमांडची बंद केले गुप्त बैठक सुरू आहे. कालच दिल्ली हायकमांडने तुम्हीं दोघांनीच चर्चा करा आणि या दिल्लीला असा आदेश सिद्धरामय्या डी.के .शिवकुमार यांना बजावला आहे. पण, आज सकाळी दोघांनीही एकत्र तब्बल वीस मिनिटे केलेला ‘ब्रेकफास्ट’ वरून राजकीय ‘रण’ पेटले आहे. विरोधी भाजपकडून सरकारचे हे नाटक असून, आपले अपयश लपविण्यासाठी हा ड्रामा असल्याचाही आरोप त केला जात आहे.
…दोघांच्या राजकारणामुळे धनगर विरूद्ध लिंगायत समाजात तीव्र आक्रोश…
मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे धनगर समाजाचे तर डी .के.शिवकुमार हे लिंगायत संप्रदायातले आहेत, त्यामुळे दोघांच्या राजकारणामुळे हे दोन्हीं समाज एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. धनगर समाजाकडून मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच कायम राहतील, नाही तर आम्हीं संपूर्ण राज्य पेटवू अशी धमक दिली जात आहे. तर लिंगायत समाजाकडून डी के शिवकुमार यांनी मुख्यमंत्री व्हावे पूजा – अर्चा, ठिकाणीं मोर्चे सुरू आहेत. त्यामुळे या राजकारणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत..







Leave a Reply