कणकुंबीतील कळसानंतर आणखी एका प्रकल्पाची मराठी भाग म्हणून जबरदस्ती का? आमदार-स्थानिक नेते मूग गिळून गप्प का? नागरिकांनी आताचा जागृत होण्याची गरज… नाही तर प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर काहीच उपयोग नाही..
फोटो: हाच तो प्रकल्प कुसमळी जवळ नदीमध्ये होवू घातला आहे…
जांबोटी: विलास कवठणकर (लोकहित न्यूज)
एक तर जांबोटी भागात विकास कमी तर दुसरीकडे सरकारचा भकासच अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कणकुंबीतील वादग्रस्त कळसा प्रकल्पानंतर आता आणखी एक प्रकल्प कुसमळीजवळ मलप्रभा नदीवर उभारण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला आहे. नदीमध्ये पाण्याचे डॅम बांधून येथील पाणी बेळगांव तालुक्यातील संतीबस्तवाड, रणकुंडयेसह लगतच्या गावांना नेण्यात येणार आहे. जांबोटी भागातील स्थानिकांना पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे. शिवाय, कुसमळीच्या खालच्या गावांना, शेतकऱ्यांना पाणी कमी पडणार आहे, कणकुंबीनंतर राज्य सरकारकडून जांबोटी भाग टार्गेट केला जातो की, मराठी भाग आहे म्हणून नुसताच या भागाचा वापर करणार का? सरकार कुसमळी (खानापूर तालुक्यातील ) जांबोटी पश्चिम भागातील पाणी पुढील भागासाठी पळवून नेणार आहे , तर मग याचा स्थानिकांना काय लाभ? एवढा मोठा प्रकल्प आपल्या तालुक्यात होत असताना, आमदार, माजी आमदार स्थानिक नेते मूग गिळून गप्प का? वेळीच नागरिकांनी जागरूकता न दाखवण्यास सदर प्रकल्प पूर्ण झाल्या नंतर काहीच उपयोग होणार नाही…
…सदर प्रकल्पासाठी 280 कोटी मंजूर… मोठ्या पाईप लाईनद्वारे पाणी बेळगांवकडे नेणार…
कुसमळीजवळ होवू घातलेल्या डॅमसाठी तब्बल 280 कोटींचा निधी पाटबंधारे खात्यातून मंजूर करण्यात आले आहेत. त्यातून नदीमध्ये मोठी विहीर बांधुन मोठ्या पाईप लाईनद्वारे संतीबस्तवाड , रणकुंडयेसह लगतच्या गावांना पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. पण, स्थानिकांना याचा काय लाभ? याचे उत्तर सरकारकडे नाही असेच दिसत आहे…
प्रकल्पासाठी जागा जबरदस्तीने घेतल्याची चर्चा; शिवाय जागेला डबल रेट ? चीही चर्चा….
सद्या ज्या ठिकाणीं हा प्रकल्प सुरू आहे, ती जागा शेतकऱ्याने नाही म्हणतासुद्धा जबरदस्तीने, तीही डबल रेट’ने सरकारने विकत घेतल्याची चर्चा आहे. ही खरेदी दोन एक्करची असून, यासाठी कोटीच्या घरात सरकारी निधी उडवल्याचीचेही बोलले जात आहे. याची लोकहित न्यूजकडून तपासणी सुरू आहे, ती उपलब्ध झाल्यानंतर वाचकांसमोर प्रसिद्ध केली जाईल.
चौकट –
आमदार साहेब यामध्ये जरा लक्ष घाला; नाही तुमचेही नाव येईल…
तालुक्याचे मेन बॉस म्हणून आमदार यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्याशिवाय कोणताही सरकारी कार्यक्रम, योजना तालुक्यात येवूच शकत नाही. त्यामुळे याही प्रकल्पाविषयी त्यांना कल्पना असेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.. असेल तर त्यांनी स्थानिकांचा नक्कीच विचार केला पाहिजे. कारण , स्थानिक पहिला नंतर सर्वकाही. आमदार विठ्ठल हलगेकर यांना माहीत नसेल तर त्यांनी तत्काळ या प्रकल्पाचा पाठपुरावा करावा अशीच अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे…
प्रतिक्रिया –
कर्नाटक सरकार मराठी भाग म्हणून जांबोटी पश्चिम भागावरच नेहमी अन्याय होताना दिसत आहे. कुसमळीकडील हा प्रकल्प स्थानिकांच्या मुळावर बसवला जात आहे. याविरोधात नागरिकांनी आवाज उठवण्याची गरज आहे, नाही तर वेळ गेल्यानंतर जागे होणे काहीच उपयोगाचे होणार नाही. हा प्रकल्प उभारताना स्थानिकांना याचा काय लाभ? याचे उत्तर सरकारने द्यावे अशी आमची मागणी आहे.
–जयराम देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य जांबोटी.
आमच्याच गावात हा प्रकल्प होत असताना, आम्हाला कोणतीच पूर्वकल्पना नाही, आम्हीं बैलुर पंचायतीवर अध्यक्ष म्हणून कार्यरत असुन, हा परिसर या पंचायतीच्या हद्दीत येत असतानाही पंचायतीलाही कोणतीच पूर्वकल्पना दिली नाही. त्यामुळे हा प्रकल्प आहे तरी काय? … याचीही माहिती नाही.. या प्रकल्पामुळे भविष्यात खालच्या व आजूबाजूच्या स्थानिक शेतकऱ्यांना पाणी पडले तर याला जबाबदार कोण? त्यामुळे पहिल्यांदा याचा सरकारने खुलासा करावा… नसेल तोपर्यंत आमचा विरोधच राहील.
–अनंत सावंत, सामाजिक कार्यकर्ते, भाजप नेते कुसमळी.
प्रतिक्रिया –
रणकुंड्ये, संतीबस्तवाडसह लगतच्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी हा प्रकल्प आम्हीं हाती घेतला आहे, राज्याच्या बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्याच मतदार क्षेत्रातील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ही योजना आखली आहे. हे पाणी आम्ही पावसाळ्यामध्ये तिकडे नेणार आहे..
–केदारजी, अभियंता जिल्हा (एरीजेशन,) पाठबाधारे खाते.






Leave a Reply