भाजप 16 जेडीयूचे 15 मंत्र्यांचा उद्या (20 ) रोजी होणार प्राथमिक शपथविधी; पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार की? नाही, याबाबत साशंकता…
पाटणा: लोकहित न्यूज नेटवर्क (विलास कवठणकर)
संपुर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार सत्तास्थापनेला गती आली असून, उद्या (गुरुवार दि. 20 ) दहाव्यांदा नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहणार असल्याचे पहिल्यांदा ठरले होते, पण अलीकडे त्याबद्दल अधिकृत माहिती नाही. मोदी यांनी उपस्थित राहणार असल्याने एकदाच 35 मंत्र्यांचा प्राथमिक शपथविधी होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामध्ये भाजप 16 तर जेडीयू 15 , चिराग पासवान, जीतराम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांच्या घटक पक्षांना एक -दोन मंत्रीपदे असे सूत्र नीतिशकुमार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या काहीं तास झालेल्या बैठकीत ठरले आहे. मात्र, विश्वासदर्शक ठराव पार पडल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होईल.
भाजप प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र प्रधान, जेडीयू कार्याध्यक्ष संजय झा आणि केंद्रीय मंत्री ललन सिंह यांच्या बैठकीनंतर अंतिम यादी..
केंद्रीय मंत्री ललन सिंह जेडीयूचे कार्याध्यक्ष संजय झा यांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित यांच्या बैठकीत सत्तास्थापना आणि कोणत्या पक्षातील किती जणांची मंत्री म्हणून वर्णी लागणार यावर चर्चा झाली. तर भाजप प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र प्रधान यांनी पाटणा येथे दाखल होवून अंतिम यादीला रूप देणार आहेत.
उपमुख्यमंत्र्यांची संख्या किती आणि कोण हे आजच्या बैठकीत ठरेल…
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सकाळीच पाटणा येथे दाखल झाले आहेत, त्यांच्यासोबत मोजक्याच आमदार आणि नेत्यांची आज बैठक पार पडेल, त्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी संख्या किती असावी, आणि यासाठी कोणा कोणाची निवड करायची हे ठरेल. मुख्यमंत्री नितीशकुमार झाले तर उपमुख्यमंत्री, गृह आणि अर्थ खात्यावर भाजपची मोहोर लगेल यात तिळमात्र शंका नाही. त्यानंतरच एनडीएचे सरकार उद्या स्थापन होईल.






Leave a Reply