निवड समितीला चांगलीच चपराक तीन सामन्यांमध्ये रोहितचे एक शतक आणि एक अर्ध शतक झळकावले..
सिडनी: लोकहित न्यूज नेटवर्क …
आज सिडनीत झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हिटमॅन रोहीत शर्माने चांगलीच चमक दाखवत शानदार शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोहितचे हे 50 वें शतक असून, एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक षटकाच्या क्रमवारीत प्रथम क्रमांकावर येण्यासाठी अजून त्याला तीन षटकारांची गरज आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेपटू शहीद आफ्रिदीने 351 षटकार मारले असून तो क्रमांक एकवर आहे, तर आजच्या सामन्यांत तीन षटकार ठोकत एकूण 349 षटकार ठोकत दुसऱ्या क्रमांकावर आहे, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट प्रकारात सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या स्पर्धेत अफ्रिदीला मागे टाकण्यासाठी रोहितला अवघ्या दोनच षटकारांची गरज आहे. आजच्या सामन्यात रोहित आणि कोहलीने चांगली खेळी साकारली, त्याने 81 चेंडूत 74 धावा केल्या. दोघांमध्ये तिसऱ्या गड्यासाठी 120 च्या वर भागीदारी झाली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 337 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले होते. रोहित आणि विराटच्या चांगल्या खेळीने ऑस्ट्रेलियाने दिलेले आव्हान भारताने सहज पूर्ण केले.
निवड समितीला चांगलीच चपराक; टीकाकारांना प्रत्युत्तर…
एकदिवसीय सामन्याचा कर्णधार म्हणून रोहित शर्माला कायम ठेवलेले असताना, निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक यांच्याकडून अचानक रोहितकडून कर्णधारपद काढून घेवून नवख्या शुभमन गिलकडे देण्यात आल्याने निवड समिती क्रिकेटप्रेमींकडून चांगलीच ट्रोल झाली. अनुभव आणि युवा यात फरक असताना हे असे कसे घडले असा प्रश्न क्रिकेप्रेमींना पडला, यात नवल काय? रोहितच्या कर्णधारपदाबाबत जाणीवपूर्वक राजकारण झाल्याचेही बोलले जात होते. तरीही निवड समितीने पुढील तयारीचे कारण देत, आपल्या मतावर ठाम असल्याचे दाखवून दिले. मात्र, आजच्या खेळीने रोहितने आपल्या दमदार खेळातून जुन्या आठवणी जाग्या केल्या आणि निवड समिती आणि टीकाकारांना चांगलेच प्रत्युत्तर दिले. पण, 2027 च्या वर्ड कपमध्ये रो-को खेळतील की, नाही याबाबत शंका असली तरी, आजच्या दमदार खेळीने हे दोघेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये कायम राहतील असा अंदाज क्रिकेतप्रेमींतून बांधण्यात येत आहे.






Leave a Reply