डॉ. निंबाळकर यांच्या रायगड या निवासस्थानी हेल्मेटचे वाटप करून शिवस्मारक चौकात ‘बर्थडे केक’ कापण्यात येईल..
खानापूर: लोकहित न्यूज
खानापूरच्या माजी आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्या आजच्या वाढदिनानिमित्त खानापूर शहरातील काहीं भागांत हेल्मेट वाटपाबरोबर जागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार तालुका ब्लॉक काँग्रेसच्यावतीने तालुक्यात जागृती करून, हेल्मेटचे वाटप करण्यात आले आजकाल दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघातात हेल्मेटअभावी बळी जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचाच पाठपुरावा म्हणून तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ॲड ईश्वर घाडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉ.निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त हेल्मेट वाटप करून शहराच्या काहीं भागांत हेल्मेटची जागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सकाळीं शिवस्मारक चौकात केक कापून, शहरात हेल्मेट जागृती व त्याचे वाटप अशा दुहेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ॲड ईश्वर घाडी, सुरेश जाधव, दीपक कवठणकर, सुर्यकांत कुलकर्णी, ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील, गुड्डू टेकडी, तोहिबसाब, ईशाक पठाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.








Leave a Reply