समाजकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेल्या दीड कोटी निधीचा शुभारंभ…
हब्बनहट्टी: विलास कवठणकर (लोकहित न्यूज)
बेळगांव जिल्ह्यातच प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री स्वयंभू मारुती हब्बनहट्टी ( ता. खानापूर) तीर्थक्षेत्रावर आतापर्यंतच्या इतिहासातील मोठा सरकारी निधी मंजूर झाला आहे. राज्याच्या बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून तब्बल दिड कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. श्रावण सोमवार निमित्त जणू ‘लक्ष्मी’ बरसल्याची अनुभूती देवस्थान कमिटी, भाविक आणि हितचिंतकांना आल्याशिवाय राहणार हे मात्र नक्कीच! त्याला देवस्थान कमिटीचेही अथक परिश्रम कामी आले असेही म्हणण्यास अजिबात वावगे ठरणार नाही. त्या निधीतून देवस्थानचा विकास होणार असून, यामुळे देवस्थानच्या प्रसिद्धीबरोबर नावलौकीकही अधिकच वाढणार आहे. आमदार विठ्ठल हलगेकर, विधान परिषद चन्नाराज हट्टीहोळी, देवस्थान कमिटीच्यावतीने आज शुभारंभ करण्यात आला. सदस्य माजी कमिटी सचिव सुनिल चीगुळकर यांनी स्वागत करतांना मंत्री हेब्बाळकर व कमिटीचे कौतुक केले. व्यासपीठार काँग्रेस युवा नेते मृणाल हेब्बाळकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कर्नाटकचे मुख्यस्त किरण गावडे, आमटे पंचायत अध्यक्षा सरस्वती भरणकर, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर, माजी अध्यक्षा पार्वती नाईक, यशवंत बिर्जे, तालुका पंचायत अधिकारी, पीडीओ एम. एस. मोकाशी व देवस्थान कमिटीचे सर्व सदस्य , दौलत कोलीकर , काळू नाईक, सुनिल नाईक, पवन गायकवाड, सदस्य नागोजी पाटील यांच्यासह गावकरी उपस्थीत होते. यावेळी मंत्री हेब्बाळकर यांचा विशेष सत्कार ठेवण्यात आला होता, मात्र, राज्यातील एका चर्चेचा विषयामुळे त्या हजर राहू शकल्या नाहीत.

मान्यवरांच्या हस्ते गंगा पूजन, विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले..
यापुढेही काहीं कमी पडू देणार नाही: आ. हलगेकर .
यापुढेही काहीं कमी पडू देणार नाही: आ. हलगेकर
यावेळी दोन्हीं आमदार आणि उपस्थीत मान्यवरांच्याहस्ते मलप्रभेचे गंगा पूजन करण्यात आले. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमही पार पडले .
यापुढेही काहीं कमी पडू देणार नाहीं: आमदार हलगेकर
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्राला भरीव असा निधी दिल्याबद्दल त्यांचें प्रथमतः मी आभार मानतो, यापुढेही आम्हीं याठिकाणी कोणताही गोष्ट कमी पडू देणार नाहीं अशी या ठिकाणी ग्वाही देतो असे आ. हलगेकर यांनी याठिकाणी बोलतांना सुचित केले.






Leave a Reply