बैलुर परिसरातील गावे आरोग्यसेवेसाठी केएलईने’दत्तक ‘ घेतल्याने सदस्यांकडून अभिनंदन..
बेळगांव: लोकहित न्यूज
केएलईने खानापूर तालुक्यातील काही गावांसह बैलूर पंचायत क्षेत्रात येणाऱ्या गावांना आरोग्यसेवा देण्यासाठी दत्तक घेतल्याची माहिती गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांना दिली. पाटील यांनीच ही मागणी केली होती त्याची पूर्तता केएलईकडून करण्यात आली आहे. ही आनंदाची बाब असून, ही माहिती बैलूर ग्राम पंचायत सदस्यांना कळताच आज ( शुक्रवार) त्यांच्याकडून येळूर येथील कार्यालयात केएलएचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत देसाई यांची भेट घेऊन अभिनंदन केले. तुम्हीं आमच्या भागासाठी घेतलेला उपक्रम फार मोलाचा असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते अनंत सावंत यांनी यावेळी मांडले. तर ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर, शाहू पाटील, टी. के. बिर्जे यांनीही या उपक्रमाबध्दल समाधान व्यक्त केले. गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या पुढाकाराने ही भेट झाली. यावेळी मनोहर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
……केएलईचा काय आहे हा उपक्रम….
केएलईने ‘दत्तक ‘ घेतलेल्या खानापूर तालुक्यातील गावांना एक प्रकारचे आरोग्य ‘कवच’ च मिळणार आहे. बहुतेक आजारांवर असणाऱ्या आरोग्य सेवांवर मोफत सुविधा मिळणार आहेत. अर्थात सदर गाव परिसरातील नागरिकांना 5 लाखापर्यंत आरोग्य सेवा मोफत मिळतील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन के एलईकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply