केएलईचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत देसाई आणि ग्रा.पं. सदस्य प्रसाद पाटील यांच्यात प्रदीर्घ चर्चा….
खानापूर: लोकहित न्यूज…
आजच्या युगात आरोग्य हा विषय महत्वाचा घटक ठरला आहे. तोच धागा पकडत नेहमीच समाज सुधारणेसाठी धडपडणाऱ्या गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांच्या अथक परिश्रम आणि प्रयत्नातून केएलईकडून गर्लगुंजीसह निटूर, बैलुर, तोपीनकट्टी , बरगावं ही पाच गावे ‘दत्तक ‘ घेण्यात येणार असून, त्या गावांना एमबीबीएस डॉक्टरांकडून सेवा मिळणार आहे. शिवाय तत्काळ मोफत अँब्युलन्स सेवाही पुरवण्यात येणार आहे. या सुविधा केएलईचे अध्यक्ष प्रभाकर कोरे यांच्या जन्मदिनापासून सुरू होतील असे जाहीर करण्यात आले आहे.
…..काय काय सुविधा मिळणार…
केएलई च्या या योजनेचा आतापर्यंत 1000 हून अधिक रुग्णांना उपचार मिळाले आहेत. तर ब्लड बँकेतून रक्त देण्याचीही सुविधा मिळाली आहे. तसेच रेशन कार्ड, यशस्विनी, वाजपेयी आरोग्य योजनेतून ही लाभ मिळणार आहेत. त्यामुळे या सर्व योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रसाद पाटील यांनी केले आहे.b
Leave a Reply