रोहन जगदीश यांची गदग जिल्हा पोलिसप्रमुखपदी बढती..
बेळगांव: लोकहित न्यूज..
राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, गेल्याच आठवड्यात बेळगांव शहर कायदा सुव्यवस्था विभागाचे डिसीपी रोहन जगदीश यांची गदग जिल्हापोलिसप्रमुख पदी बढती देण्यात आली. तर त्यांच्या जागी धारवाड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या तसेच याआधी बेळगांवात सेवा बजावलेल्या नारायण बरमणी यांची वर्णी लागली आहे.
…बरमनी यांची बेळगाव बदलीने’ त्या ‘घटनेची आठवण ताजी झाली….
बेळगावातील एका कार्यक्रमात काहीं आंदोलकांनी गोंधळ घातल्याने संतप्त झालेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगावचे एसपी कोण? असे विचारताच बरमणी यांनी पुढे झाले, अन् मुख्यमंत्र्यांनी थेट त्यांच्यावरच हात उगारला. या घटनेची राज्यभर चर्चा रंगल होती. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत राजकीय आरोप -प्रत्यारोपही झाले. शिवाय अधिकाऱ्यांच्या इज्जतीचाही प्रश्न उपस्थित झाला होता. राजकीय नेत्यांसमोर अधिकाऱ्यांची काहीं किंमत नसते काय? अशीही चर्चा रंगली होती. आता ते नारायण बरमणी बेळगावला डीसीपी म्हणून सेवा बजावणार आहेत, त्यावरून सदर घटनेची आठवण ताजी झाली आहे..
Leave a Reply